• Sat. Sep 21st, 2024

Mumbai Fire: बेकरीत गॅस गळती, मग मोठा स्फोट, भीषण आगीत दोन मुलांसह सहा जण होरपळले

Mumbai Fire: बेकरीत गॅस गळती, मग मोठा स्फोट, भीषण आगीत दोन मुलांसह सहा जण होरपळले

मुंबई: मुंबईतील खारदांडा परिसरात भीषण घटना घडली आहे. खारदांडा येथील एका बेकरीत गॅस गळती झाल्याने आग भडकली. या आगीत सहाजण होरपळले आहेत. सध्या या ६ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. आगीमुळे बेकरीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. घटनेनंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी मोठ्या शर्थीचे प्रयक्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं.
मुंबईतील खार उपनगरात खारदांडा येथील गोविंद पाटील मार्गावर हरिश्चंद्र बेकरी आहे. या बेकरीत गॅस गळती झाली. त्यानंतर सकाळी ९ वाजेच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भयानक स्फोट झाला. यानंतर परिसरातील नागरिकांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न केले.

Crime News: पत्नी, काकू, वहिनी आणि माहेरी आलेल्या बहिणीला संपवलं, घटनेने सारं गाव दहशतीत
या आगीच्या घटनेत ६ जण होरपळल्याची माहिती आहे. त्यांना आगीतून बाहेर काढत तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली आहे, तर कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. आगीमुळे जखमी झालेल्या ६ जणांवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. हे सहा जण ६ ते ६५ वयोगटातील आहेत. हे सर्वजण ४० ते ५१ टक्के भाजले आहेत. जखमींमध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed