मानखुर्द स्थानक परिसरात शनिवारी मध्यरात्री १.०५ ते रविवारी पहाटे ४.३५पर्यंत अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अप-डाऊन लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, शेवटच्या लोकलमध्ये बदल करण्यात आला आहे. हार्बर मार्गावर रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांना शेवटची पनवेल गाडी पकडण्यासाठी जवळपास अर्धातास आधी सीएसएमटी गाठावे लागणार आहे. ब्लॉकनंतर पहिली लोकल रविवारी पहाटे ४.३० पनवेल-सीएसएमटी असणार आहे.
मध्य-हार्बरवर उद्या खोळंबा
मुंबई : माटुंगा ते ठाणे आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदरदरम्यान शनिवारी-रविवारी मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार असल्याने दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.
मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)
स्थानक : माटुंगा ते ठाणे
मार्ग : अप आणि डाऊन धीमा
वेळ : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५
परिणाम : ब्लॉकवेळेत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही फेऱ्या रद्द राहणार असून, काही २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
हार्बर मार्ग
स्थानक : पनवेल ते वाशी
मार्ग : अप आणि डाऊन
वेळ : सकाळी ११.०५ ते ३.५५
परिणाम : सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे ते पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. तसेच, सीएसएमटी ते वाशीदरम्यानच्या फेऱ्याही रद्द राहणार आहेत. बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर, ठाणे ते वाशी/नेरुळदरम्यान लोकल सुरू राहणार आहेत.
पश्चिम रेल्वे
स्थानक : वसई रोड ते भाईंदर
मार्ग : अप आणि डाऊन जलद
वेळ : शनिवारी रात्री ११.३० ते रविवार पहाटे ०४.४५
परिणाम : ब्लॉकवेळेत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही फेऱ्या रद्द राहणार असून काही विलंबाने धावणार आहेत.