पुण्यातील विमाननगर भागामध्ये असणाऱ्या एका आयटी हबमध्ये मोठी आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. सॉलिटर बिझनेस हब या आयटी कंपनीमधे दुपारी १२.३७ वाजता आग लागली होती. बेसमेंटला असणाऱ्या इलेक्ट्रिक रुममधे आग लागून वर शेवटच्या नवव्या मजल्यापर्यंत त्याचा धूर मोठ्या प्रमाणात पसरला गेला, असा प्राथमिक अंदाज आहे. धुरामुळे आग नेमकी कुठे लागली आहे, हे कळत नव्हतं. मात्र अग्निशमन दलाच्या ४ गाड्या आणि १ पाण्याचा टँकर, ०१ ब्रॉन्टो उंच शिडीचे वाहन दाखल झाले. आणि अग्निशमन दलाने तात्काळ बचाव कार्य सुरू केलं आणि आग नियंत्रणात आणली.
Pune Fire News : पुण्यात आज दुपारी आगीची मोठी घटना घडली. सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणली. पण आग लागली त्यावेळी हजारो कर्मचारी काम करत होते.
पुण्यातील विमाननगर भागामध्ये असणाऱ्या एका आयटी हबमध्ये मोठी आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. सॉलिटर बिझनेस हब या आयटी कंपनीमधे दुपारी १२.३७ वाजता आग लागली होती. बेसमेंटला असणाऱ्या इलेक्ट्रिक रुममधे आग लागून वर शेवटच्या नवव्या मजल्यापर्यंत त्याचा धूर मोठ्या प्रमाणात पसरला गेला, असा प्राथमिक अंदाज आहे. धुरामुळे आग नेमकी कुठे लागली आहे, हे कळत नव्हतं. मात्र अग्निशमन दलाच्या ४ गाड्या आणि १ पाण्याचा टँकर, ०१ ब्रॉन्टो उंच शिडीचे वाहन दाखल झाले. आणि अग्निशमन दलाने तात्काळ बचाव कार्य सुरू केलं आणि आग नियंत्रणात आणली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.