• Mon. Nov 25th, 2024
    ट्रॅक्टरने रिक्षाला उडविले, संतप्त ग्रामस्थांचे धक्कादायक कृत्य, पाहणाऱ्यांचा उडाला थरकाप

    जळगाव : वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने लग्नात आलेल्या प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिल्याची घटना जळगाव तालुक्यातील आव्हाने गावातील बसस्थानकजवळ मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात रिक्षाचालकासह तीन महिला जखमी झाल्याने गावातील संतप्त ग्रामस्थांनी वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.तालुक्यातील आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. राहूल बारेला (रा. मध्यप्रदेश ह.मु. आव्हाणे ता.जि.जळगाव) याच्या मालकीचे दोन ट्रॅक्टर वाळू भरून मंगळवारी दुपारी ३ वाजता आव्हाणे गावातील मरीमाता मंदिराकडून येत होता. या ट्रॅक्टरने जळगावकडून येणाऱ्या (एम.एच.१९,१४१३) रिक्षाला उडविले. त्यात तीन प्रवाशांसोबत रिक्षा चालक जखमी झाला.

    महिला डॉक्टर ९ महिन्यांपूर्वी कामाला लागली, अजून पगारच मिळाला नाही… उचलले धक्कादायक पाऊल
    ही घटना गावाच्या बसस्थानकावर घडली. या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सोडून फरार झाला. या घटनेनंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी रिक्षाला ठोकणाऱ्या ट्रॅक्टरला आग लावली. त्याचवेळी गिरणा नदीपात्रातून येत असलेल्या एका ट्रॅक्टरला देखील ग्रामस्थांनी आग लावली. दोन्ही ट्रॅक्टर ग्रामस्थांनी पेटवून लावले.

    ही घटनेला दीड तास उलटून सुद्धा घटना स्थळी पोलीस किंवा महसुल प्रशासनाचा एकही अधिकारी घटनास्थळावर पोहचला नाही. त्यात नदीपात्रात असलेले सर्व ट्रॅक्टर व डंपर देखील गायब झाले. मात्र, तरीही महसुल व पोलीस यंत्रणेपैकी कोणीही घटनास्थळी पोहचलेले नव्हते. दरम्यान, दोन्ही ट्रॅक्टरवर विना नंबर असल्याने हे ट्रॅक्टर नेमके कोणाचे हे कळले नव्हते. ही घटना घडल्यानंतर दोन्ही ट्रॅक्टर चालकांनी जागेवर ट्रॅक्टर सोडून घटनास्थळाहून पसार झाले. अपघातानंतर आव्हाणे गावातील संतप्त ग्रामस्थांनी उभे असलेले दोन्ही ट्रॅक्टर पेटवून दिले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

    सबसे कातिल, गौतमी पाटील! गौतमीचा कार्यक्रम सुरू झाला, तुफान गर्दी, तरुण उभे असलेले पत्र्याचे छत कोसळले
    दीड तासानंतर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे काम सुरू केले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या घटनेची जळगाव तालुका पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

    चोरट्या वाळू वाहतुकीवर प्रशासनाचा कोणताही धाक नसल्याचा प्रत्यय

    जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावाच्या नजीक असलेल्या गिरणा नदीतून बेसुमार अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात आहे. रात्रंदिवस ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळूची चोरी वाहतूक केली जात आहे. वाळू वाहतूकदारांवर पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाचा कोणताही धाक राहिलेला नसल्याचा प्रत्यय आजच्या घटनेतून दिसून आला आहे.

    डोकच चक्रावतं! तोतया NCB अधिकाऱ्याच्या ७ पत्नी, डेप्युटी रेंजरशीही केले लग्न, असा झाला भांडाफोड

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed