• Sat. Sep 21st, 2024
Sharad Pawar:  रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड; सचिवपदी निवृत्त…

सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या मंगळवारी झालेल्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत संस्थेच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची फेरनिवड करण्‍यात आली. पदाधिकारी निवडीत पवार यांनी सचिवपदाची भाकरी फिरविली नाही. आगामी काळात संस्थेच्या सचिवपदी निवृत्त सनदी अधिकारी बसविण्याची शक्यता आहे.कर्मवीर पुण्यतिथीदिनी नऊ मे रोजी दर तीन वर्षानी संस्थेचे पदाधिकारी निवडले जातात. आज त्या निवडी होणार होत्या. मात्र त्या झाल्या नाहीत. केवळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, आजीव सेवक, मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्य यांचीच निवड करण्यात आली. सचिवपदी निवड केली नाही.

सध्याचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर हेच पुढील सहा महिने राहणार आहेत. तसेच कार्याध्यक्ष आणि उपकार्याध्यक्ष पदाची निवड २७ मे रोजी पुण्यातील मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत होणार आहेत.

शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारुढ पुतळा महाराष्ट्रात! उंची ३२ फूट, वजन १० हजार…
संस्थेत प्रशासनाला योग्य दिशा मिळावी यासाठी आगामी काळात सचिवपदी सनदी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार असल्याची शक्यता असून साताऱ्याचे माजी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.

आज नेमण्यात आलेले उपाध्यक्ष, आजीव सेवक आणि मॅनेजिंग कौंन्सिलचे सदस्य पुढीलप्रमाणे. उपाध्यक्ष – जयश्री चौगुले (वाशी) , अरुण कडू -पाटील, पी. जे. पाटील (उरण), ॲड. राम काडंगे (पुणे), महेंद्र लाड (पलूस).

मॅनेजिंग कौंन्सलचे सदस्य – ॲड. भगिरथ शिंदे, माजी मंत्री अजित पवार, आमदार दिलीप वळसे-पाटील, रामशेठ ठाकूर, ॲड. रविंद्र पवार, मीनाताई जगधने, आमदार डॉ. विश्वजित कदम, प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी, अजित भिकुगोंडा पाटील, राहुल जगताप, जनार्धन जाधव, दादाभाऊ कळमकर, प्रा. सदाशिव कदम, धनाजी बलभीम पाटील. आजीव सेवक प्रतिनिधी – प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, आनंदराव तांबे, प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, विनोदकुमार संकपाळ, सुभाष लकडे, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, लाईफ वर्कर प्रतिनिधी- नवनाथ जगदाळे, प्रा, डॉ. संजय नगरकर, सौ. ज्योत्स्ना सुधीर ठाकूर.

भर मंचावर शरद पवारांच्या डोळ्यात पाणी, रयत शिक्षण संस्थेची वाटचाल ऐकताना पवार गहिवरले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed