• Sat. Sep 21st, 2024
हनीट्रॅपमध्ये अडकून पाकला गोपनीय माहिती, एटीएसने DRDO संचालक कुरुलकरांभोवतीचा फास आवळला

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानला महत्त्वाची गोपनीय माहिती पुरवल्याच्या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने अटकेची कारवाई केली आहे. या प्रकरणात एटीएसने तपासाचा वेग वाढवत कुरुलकर यांच्याकडून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.डॉ. प्रदीप कुरुलकर सध्या राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) कोठडीत आहेत. विशेष न्यायालयाने त्यांना मंगळवार, ९ मेपर्यंत एटीएस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. कुरुलकर हे सप्टेंबर २०२२ पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांच्या संपर्कात होते, या दरम्यान त्यांनी पाकिस्तानला नेमकी कोणती माहिती पुरवली, हे जाणून घेण्यासाठी त्यांचा मोबाइल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आलं आहे.

Sameer Wankhede Kranti Redkar : समीर वानखेडे-क्रांती रेडकरचे वाशिम दौरे वाढले, विधानसभेला उतरण्याच्या चर्चा
अधिक माहिती अशी की, लॅपटॉप तसेच मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. देशाची गुप्तचर यंत्रणा रिसर्च अॅण्ड अॅनॅलिसिस विंगकडून (रॉ) कुरुलकरांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक विश्लेषणातून अनेक धक्कादायक बाबींवर प्रकाश पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करून कुरुलकरांनी पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती दिल्याचे तपासात आढळून आले आहे.

Chandrapur : मानसशास्त्रीय परीक्षेतून सायबर क्राईम रोखण्यासाठी जनजागृती

संरक्षण संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे पुणे येथील त्यांच्या कार्यालयामधून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (PIO) चे हस्तक यांच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉटअपद्वारे व्हाईस मेसेज, व्हिडिओ कॉलने संपर्कात राहिले असल्याची माहिती ATS ला मिळाली होती. त्यासोबत डी. आर. डी. ओ. च्या शास्त्रज्ञ पदाचा गैरवापर करत त्यांच्या ताब्यात असलेली संवेदनशील शासकीय माहिती ते पाकिस्तानला पुरवत असायचे. प्राथमिक अंदाजानुसार हनी ट्रॅपमध्ये सापडल्याने ते पाकिस्तानला माहिती देत असल्याचा संशय आहे. दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

बायकोला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याला म्हणते, थांब कपडे घालू दे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed