मुंबई : आठवड्याभरावर येऊन ठेपलेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबतची ‘डिनर डिप्लोमसी’ आणि मंत्र्यांच्या गोटात पसलेली अस्वस्थता असं सगळं वातावरण असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’, असा एल्गार केल्याने ते कधी येतील आणि कोणत्या रुपात येतील? असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. त्यापुढेही जाऊन त्यांनी मी कसा येतो, हे सगळ्यांनीच पाहिलंय म्हणत भूकंपाचे सूचक संकेतही दिले आहेत.पुढच्या आठवड्याच पाच सदस्यीय घटनापीठातील एक न्यायमूर्ती निवृत्त होत असल्याने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अगदी काहीच दिवसांत लागेल, अशी शक्यता राजकीय जाणकार आणि ज्येष्ठ विधिज्ज्ञ देखील व्यक्त करयातेय. याच पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या ‘पुन्हा येईन’ या वक्तव्यांमागे विविध अर्थ लावले जातायेत. कोल्हापुरात बोलताना मी पुन्हा येईन आणि कसा येतो ते तुम्हाला माहितीये असं वक्तव्य फडणवीसांनी केलं. त्यांच्या याच वक्तव्यावर शरद पवार यांनी त्यांच्या ‘खास स्टाईल’ने प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंच्या मिमिक्रीला अजितदादांकडून ‘टिळक स्टाईल’ने प्रत्युत्तर, मनसेचा इतिहासच काढला!
शरद पवार म्हणतात…
कोर्टाचा बहुप्रतिक्षित निकाल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा धागा जोडण्याचा शरद पवार यांनी प्रयत्न केला. ते म्हणाले, “कोर्टाचा निकाल काय येईल हे मी सांगू शकत नाही पण देवेंद्र फडणवीसांना कोर्टाचा निकाल माहिती असेल त्याचमुळे पुन्हा येईन असं ते म्हणतायेत… जर त्यांना निकाल माहिती असेल तर ते काहीही बोलू शकतात…”अजित पवारांच्या घराशेजारी तरुणीचा विनयभंग, दादांचा टुकार कारट्यांना बारामतीत इशारा, माझ्या पद्धतीने…
मी पुन्हा येईन…
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहोचले देवेंद्र फडणवीस यांनी भगवान श्री नृसिंह मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतलं. त्यानंतर एका छोटेखानी सभेला संबोधित करताना शिवाजीराव पाटील यांना उद्देशून ते म्हणाले, “पाटीलसाहेब, एवढंच सांगतो की इथे एकदा येऊन माझं मन भरत नाही. त्यामुळे मी पुन्हा येईन… तुम्हाला माहितीये की जेव्हा मी सांगतो पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतो. कसा येतो हे ही तुम्हाला माहितीये… आपलं कुलदैवतच नरसिंह आहे. आपण कुठूनही आणि कशीही प्रगती करतो”