• Sat. Sep 21st, 2024
मालवाहू ट्रकला बसची पाठीमागून धडक, पुणे सोलापूर रोडवर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

दौंड : पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभ जवळ मालवाहू ट्रकला ट्रॅव्हल्सने भीषण धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी बस चालकावर दौंड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूनाथ कलबंडे यांनी अपघाताबाबत तक्रार दिली आहे. बसचालक सलीम मेहबूब सडकवाला अस गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे.

या अपघातात बसमधील शोभा गुरूनाथ कलबंडे ( वय ४५) रा.शाहु काँलनी, वेदांन्त नगरी, गल्ली नं ११, कर्वेनगर पुणे-५२ मूळ रा. बडधळ ता.अफजलपुर जि गुलबर्गा कर्नाटक व महादेव सोपान भिसे (वय-४५) हे दोघे गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-सोलापूर महामार्गावरून पुण्याकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या खाजगी बसने ( युपी.७८,एफएन.९२५७ ) धडक दिली. तक्रारदार आणि त्यांची पत्नी मल्लिकनाथमठ भिगवण येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून पुणे – सोलापूर महामार्गावरून ट्रॅव्हल्सने पुण्याला निघाले. कुरकुंभ गावच्या हद्दीत बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने समोरील वाहनांना भीषण धडक दिली.

या भीषण अपघात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. शोभा कलबंडे आणि महादेव भिसे असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. राजश्री मोरे, आकाश पोकरकर, अनिल बडेकर यांच्यासह इतर काही जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी बसचालक सलीम महेबूब सडकवाला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात बसचे पुढील बाजूचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात गुरूनाथ चन्नाअप्पा कलबंडे यांनी फिर्याद दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed