पोलिसांना बागेश्वर बाबांना बजावलेल्या नोटिशीती म्हटले आहे की, यापूर्वीच्या कार्यक्रमांच्या ठिकाणी अंधश्रद्धा पसरविल्या गेल्या, त्या आधारे समाजाचे विविध मार्गांनी आर्थिक व मानसिक शोषण करणे, चमत्काराचा दावा करून लोकांची दिशाभूल व फसवणूक केली जाणे, तसेच आपल्याकडून महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज, शिर्डीचे साईबाबा आणि महापुरुषांचा अवमान झाल्याने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संभाजी ब्रिगेड यांनी यापूर्वी आपल्या कार्यक्रमांना विरोध दर्शवलेला आहे.
ही पार्श्वभूमी पाहता श्री धीरेंद्र कृष्णा शास्त्री महाराज (बागेश्वर धाम सरकार) यांच्याकडून महाराष्ट्रातील संत व महापुरुषांचा अवमान होणा नाही, तसेच कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाहीत किंवा वैयक्तिक भावना दुखावतील असे भाष्य, वक्तव्य, घोषणा, हावभाव, चमत्काराचे दावे आपल्याकडून व जनसमुदायातील नागरिकांकडून होणा नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या बरोबरच महाराजांच्या चिथावणीवरून आपल्या हस्तकांकडून दोन धर्मांत तेढ निर्माण होऊन जनतेच्या जीवितास, मालमत्तेस धोका निर्माण होईल असे कोणतेही कृत्य तसेच अंधश्रद्धा प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन करून भाविकांची दिशाभूल करून समाजामध्ये अंधश्रद्धेचा प्रसार होईल असे कृत्य होणार नाही याची गांभिर्यापूर्वक दक्षात घ्यावी, असे ही पोलिसांनी म्हटले आहे.
या कार्यक्रमामुळे कोणताही अनुचित प्रकार झाल्यास व त्यामुळे सार्वजनिक शांतताभंग होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण व आपल्या सहकाऱ्यांविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी बजावले आहे.