• Mon. Nov 25th, 2024
    हिऱ्याची बांगडी खरेदी करायला आल्याचे भासवले, महिलेने दुकानातून चोरली ७१ हजारांची बांगडी

    छत्रपती संभाजीनगर : शहरातील सर्वात मोठा मॉल म्हणून ओळख असलेल्या प्रोझोन मॉलमध्ये बुरखा परिधान केलेली महिला ग्राहक बनून ज्वेलरी शॉप मध्ये आली. तिने दुकानातून हिऱ्याच्या बांगड्या घेण्याचा बहाणा केला. मात्र, दागिने न घेताच ती निघून गेली. जाताना हात चलाखीने ७१ हजार रुपये किमतीची एक बांगडी चोरून नेली. ही बाब मॅनेजरच्या लक्षात येताच या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर शहरातील सिडको मार्गामध्ये शहरातील सर्वात मोठा पूजन मॉल आहे. या मॉलमध्ये फाईन ज्वेलरी नावाचे एक दुकान आहे. त्या दुकानांमध्ये सोन्याची व हिऱ्यांच्या वस्तूंची विक्री होते. दुकानात दिवसभर हजारोंच्या संख्येने नागरिक खरेदीसाठी येत असतात. दरम्यान तीन मे रोजी नियमित कामकाज सुरू असताना सायंकाळ सहा वाजेच्या सुमारास ज्वेलरी शॉप मध्ये सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एक बुर्कादारी महिला ग्राहक बनून आली. त्या महिलेने हिऱ्याच्या बांगड्या खरेदी करायचा असल्याचं दुकानातील कर्मचाऱ्यांना सांगितलं.

    दुष्काळी तालुक्यात फुलला परदेशी भाषेचा मळा, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी गिरवताहेत जपानी भाषेचे धडे
    महिलेने केलेल्या मागणीनुसार कर्मचाऱ्यांनी महिलेला हिऱ्याच्या बांगड्या दाखवल्या. महिलेने बराच वेळ बांगड्या बघून झाल्यानंतर दुकानातून एकही बांगडी न घेता ती निघून गेली. मात्र जाताना तिने हात चलाखी करून दुकानातील एक हिऱ्याची तब्बल ७१ हजार रुपयांची हिऱ्याची बांगडी चोरून नेली.

    कर्मचाऱ्यांनी सर्व बांगड्या जमा करून परत ठेवत असताना त्याला त्यामध्ये एक बांगडी कमी आढळून आली. त्याने ही बाब मॅनेजरच्या लक्षात आणून दिली. यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता बुरखाधारी महिलेने हातचलाखी वापरून एक बांगडी चोरून नेल्याची बाब लक्षात आली.

    धक्कादायक! श्रीगोंदयात मानवी तस्करी, मोठं रॅकेट उघड; लोकांना डांबून भीक मागायलाही लावतात
    दरम्यान, व्यवस्थापक आणि तात्काळ सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सीसीटीव्ही फुटेजची माहिती देखील त्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी सहाय्यक व्यवस्थापक राजेंद्र कर्नावट यांच्या तक्रारीवरून दुकानातील एका तर हजार रुपयांची बांगडी चोरून येणाऱ्या अज्ञात महिलेविरोधात सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण हे करीत आहे.
    Rajouri Encounter: जम्मू-काश्मिरात IED स्फोटात ५ जवान शहीद, चकमकीत अनेक अतिरेकी ठार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *