• Mon. Nov 25th, 2024
    नागपुरात सेक्स रॅकेटप्रकरणी तुरुंगात, उझबेकिस्तानच्या महिलेकडे आढळलं आधारकार्ड

    नागपूर : वर्धा मार्गावरील हॉटेल प्राइडमधील खोली क्रमांक १०७ मध्ये उजबेकिस्तानची तरुणी देहव्यापार करताना आढळली होती. उजबेकिस्तानच्या या ३१ वर्षीय तरुणीकडे आधारकार्ड आढळून आलं असून, ती रोझ (बदललेले नाव) नावाने दक्षिण दिल्लीत राहायची. नोव्हेंबर २०१८ मध्येच तिच्या व्हिसाची मुदत संपली. त्यानंतरही ती भारतात वास्तव्यास असल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासादरम्यान समोर आली.याप्रकरणात गुन्हेशाखा पोलिसांनी उजबेकिस्तानच्या तरुणीविरुद्ध सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या तरुणीकडे असलेले आधारकार्ड खरे आहे की बोगस, याचा तपास पोलिस करत असून, दाखल गुन्ह्यात तरुणीला अटक करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाला परवानगी मागितली आहे. सोमवारी, ८ मे रोजी या प्रकरणावर सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. उजबेकिस्तानच्या या तरुणीसह इतर तीन तरुणी सध्या सुधारगृहात आहेत.

    आईसाठी विहीर खोदली अन् लेकराचं भाग्य उजळलं, मदतीला धावला पोलीस अधिकारी, आयुष्यभराची चिंता मिटली
    १ मे रोजी मध्यरात्री गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने वर्धा मार्गावरील हॉटेल प्राइडमध्ये छापा टाकून या तरुणीसह तिघींची सुटका केली. या सेक्स रॅकेटचा सूत्रधार बंटी ऊर्फ बिलाल अहमद (वय ३७, रा. शंभूनगर, मानकापूर) आणि त्याचा साथीदार राजकुमार गडेलवार (वय ४६, रा. सदर) या दोघांना अटक केली.

    Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टर आडवे लावले, समृद्धी महामार्ग रोखला, पोलिसांची धावपळ,अखेर..
    दोघांची ४ मेपर्यंत पोलीस कोठडी घेतली. कोठडीत असताना पोलिसांनी बिलाल याच्या घराची झडती घेतली. झडतीत पोलिसांना चाकू, तलवार आणि ८७ हजार रुपयांची रोख आढळली. दरम्यान, पोलीस कोठडी संपल्याने पोलिसांनी दोघांनाही गुरुवारी न्यायालयात हजर केलं. युक्तिवादानंतर न्यायालयाने दोघांची ७ मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

    बुद्ध पौर्णिमेनिमित्त सचिन तेंडुलकर पत्नीसह ताडोबाला, नागपूर विमानतळावर स्पॉट!

    नागपुरात पोलिसांचा लॉजवर छापा, कॉलेजची पोरगी ताब्यात, समोर आली धक्कादायक माहिती
    नागपुरातील वर्धा रोड येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नागपूर पोलीस क्राइम ब्राँचने या रॅकेटचा भांडाभोड केला असून दोघांना अटक केली आहे. या रॅकेटमधील मुख्य आरोपी तरुणी ही उजबेकिस्तानातील होती, तर दोन तरुणी दिल्लीच्या आहेत. व्हॉट्सअॅपद्वारे हे सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती आहे. उजबेकिस्तानातील तरुणीकडे आता आधारकार्ड आढळलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed