यानंतर २१ एप्रिल रोजी एका महिलेने पुन्हा एकदा चेंबूर पोलीस स्टेशन गाठत आपली बहिण आणि तिचा मुलगा बेपत्ता असल्याचं सांगितलं. या प्रकरणाचा कोणताही सुगावा लागला नसल्याने पोलिसांनी पीडितांचे फोटो प्रसारित केले. खबर मिळताच तात्काळ वडाळा आणि पवई इथून दोन जणांना अटकही करण्यात आली, ज्यांचा या अपहरणामध्ये सहभाग असून शकतो. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा कसून तपास केला असता त्यांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
मालमत्तेच्या भांडणावरून पनवेलला नेत वसंतची हत्या केल्याची माहिती आरोपींनी दिली. इतकंच नाहीतर काही दिवसांनी त्यांनी वसंतचा मृतदेह हा वडोदरा-अहमदाबाद महामार्गाजवळ फेकला. यानंतर आरोपींनी रोहिणी कांबळे यांच्याबद्दल विचारलं असता आरोपींनी धक्कादायक माहिती उघड केली. रोहिणी यांना एका खोलीत डांबून ठेवले असून त्या अद्याप जिवंत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठत तातडीने महिलेची सुखरूप सुटका केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनीर पठाण (४१), रोहित आदमाने उर्फ मूसा पारकर (४०), ज्योती वाघमारे (३३), राजू दरवेश (४०) अशी या प्रकरणातील ५ आरोपींची नावं आहेत. दरम्यान, प्रणव रामटेक (२५)असं या प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव आहे. अपहरण करून ठेवण्यात आलेल्या महिलेला गुंगीचं औषध दिलं होतं. तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी २ जणांना फ्लॅटवर ठेवलं होतं.
दरम्यान, या सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत कुर्ला न्यायालयात हजर केलं. तर पुढील तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.