• Sat. Sep 21st, 2024
Thane News : धडाम्! देशकर कुटुंबाच्या गॅलरीत मोठ्ठा आवाज, पाहिलं तर पाचव्या मजल्यावरुन…

कल्पेश गोरडे, ठाणे: ठाण्यातील हिरानंदानी भागात एका हाय प्रोफाईल सोसायटीत धक्कादायक घटना घडली आहे. २२ माजली इमारतीतून पडून एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. कासारवडवली पोलिस ठाण्यात प्रथमदर्शनी या घटनेची अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. तर पुढील तपास कासारवडवली पोलीस करत आहेत.ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरानंदानी येथील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये ‘द वॉक’ मॉलजवळ फॉर्च्युना ही तळ अधिक २२ मजली इमारत आहे. या इमारतीच्या बी विंगमधील ५ व्या मजल्यावरील ५०३ या रूममध्ये मुल्की कुटुंबीय राहतात.

फ्लॅटच्या गॅलरीमधून रोहिणी मुल्की ही ६५ वर्षीय वृद्ध महिला तोल जाऊन खाली पडली. पाचव्या मजल्यावरून त्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या प्रकाश देशकर या रूम नंबर २०३ च्या गॅलरीमध्ये येऊन पडल्या. मात्र या घटनेत ६५ वर्षीय रोहिणी मुल्की या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

पती जायचा न् त्याचा मित्र यायचा, एके रात्री नवऱ्याने रंगेहाथ पकडलं, मुंबईत भीषण हत्याकांड
३ मे दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पडताळणी केली. प्रथमदर्शनी कासारवडवली पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

मित्रांनी रंग लावू नये, म्हणून गच्चीवर लपला; खाली पडून तरूणाचा मृत्यू

घटनेची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सकपाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. घटनेची माहिती मिळताच सदर घटनास्थळी कासारवडवली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांच्यासह ०१ रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ०१ पिकअप वाहन तसेच अग्निशमन दलाचे जवान, ०१ रेस्क्यू वाहनासह उपस्थित झाले.

आधी बायकोचा खून, मग स्वतःचं आयुष्य संपवलं, मामाच्या गावी गेलेल्या लेकरांवर आभाळ
सदर महिलेचा मृतदेह आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या व अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने कासारवडवली पोलीस कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देऊन पुढील कार्यवाहीकरिता जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे याठिकाणी पाठवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed