• Mon. Nov 25th, 2024

    एकत्र पार्टी केली, पण मध्येच घडलं भलतंच, जिवलग मित्राचाच जीव घेतला, गोठ्यात लपून बसला

    एकत्र पार्टी केली, पण मध्येच घडलं भलतंच, जिवलग मित्राचाच जीव घेतला, गोठ्यात लपून बसला

    अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरात हत्येची एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरून एकाने आपल्या जिवलग मित्राचा निर्घृण पणे खून केल्याचा आरोप आहे. धर्माबाद शहरातील सरस्वती नगर मध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. घटनेच्या काही तासातच धर्माबाद पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. क्रांती बंसी उबाळे असं मयत तरुणाचे नाव आहे.२८ वर्षीय मयत क्रांती बंसी उबाळे आणि आरोपी सचिन उत्तम कांचणे हे दोघं नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरातील सरस्वती नगर येथील रहिवासी आहेत. दोघं जिवलग मित्र होते. मंगळवारी रात्री त्या दोघांनी परिसरातील उर्दू शाळेच्या पाठीमागील मोकळ्या जागेत दारूची पार्टी केली.

    या दरम्यान दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा टोकाला गेला आणि सचिन कांचणे याने दारूच्या नशेत क्रांती उबाळे याला मारहाण केली. त्यानंतर दगडाने डोकं ठेचून त्याचा खून केला. रक्तबंबाळ झालेल्या क्रांती उबाळे याचा जागेवरच मृत्यू झाला.

    डॉक्टरचा ३२ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील क्लिनिकमध्येच धक्कादायक प्रकार
    घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच धर्माबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन तास आरोपीचा शोध देखील घेतला. अखेर आरोपी हा गावातील एका गोठ्यात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

    कलेक्टरची हत्या केली, तुरुंगात राहून खासदार झाला, सुटकेसाठी कायदाच बदलला

    पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले. मयत क्रांती उबाळे आणि आरोपी सचिन कांबळे यांच्यात या पूर्वी देखील वाद झाला होता. याच वादातून आरोपीने मयताचा काटा काढला.

    पती जायचा न् त्याचा मित्र यायचा, एके रात्री नवऱ्याने रंगेहाथ पकडलं, मुंबईत भीषण हत्याकांड
    दरम्यान मयताची मावशी धुरपताबाई दगडे यांच्या फिर्यादी वरुन पोलिसांनी आरोपी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं कोणत्या कारणाने आरोपीने मयताचा खून केला हे अजूनही अस्पष्ट आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed