शरद पवार त्यांच्या निर्णयाबाबत गंभीर असून पक्षातून दबाव आला तरी ते त्यांच्या निर्णयापासून मागं हटणार नाहीत असं त्यांनी सांगितलं. गेल्या काही महिन्यांपासून शरद पवार यांचा याबाबत विचार सुरु होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या पिढीला संधी ते सक्रीय आहेत तोपर्यंत दिली जावी यासाठी ते विचार करत होते, असंही त्यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडी घडत आहेत. मविआच्या भवितव्याबाबत राष्ट्रवादीच्या गटात अस्वस्थता होती. महाविकास आघाडी ही निवडणूक झाल्यानंतरची आघाडी होती. निवडणूक होण्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीच आघाडी होती आता त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सहभागी आहे. जागा वाटप कसं करायचं हे देखील अस्वस्थता असल्याचं कारण असल्याचं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचे राजकीय वारसदार म्हणून दोन अजित पवार आणि सुप्रिया सुळे दावेदार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांना पाठिंबा आहे. महाराष्ट्र हे राष्ट्रवादी काँग्रेसच मुख्य कार्यक्षेत्र राहिलं असून बहुतांश आमदार आणि कार्यकर्ते अजित पवारांच्या पाठिशी आहेत. तर, सुप्रिया सुळे या खासदार असून नवी दिल्लीत कार्यरत असतात, असं पवारांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचे राजकीय वारसदार म्हणून अजित पवारांना पसंती आहे. दुसरीकडे शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांचं राजकीय स्थान देखील निश्चित करायचं असून त्यांना उच्च पदावर बसवायचं आहे, असं त्यांनी म्हणाले. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवार पक्ष सोडून जाऊ नये म्हणून शरद पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा केल्याच्या ज्या अफवा होत्या फेटाळून लावल्या आहेत.
महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची होती. आता पुढील काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मविआचं स्वरुप कसं राहणार हे पाहावं लागणार आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपाचा मुद्दा महत्वाचा असून तिन्ही पक्ष जागा वाटप कसं करणार, समन्वय कसा साधला जाणार याबाबत प्रश्न निर्माण झाल्यास त्यावेळी शरद पवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असं सूत्रांनी सांगितलं.