नाशिक : त्र्यंबकेश्वर इथे दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूच्या अंगावर ब्रह्मगिरी पर्वतावरील दरड कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मंगळवारी (दि. २) दुपारी २.३० च्या सुमारास खाली उतरत असताना अचानकपणे खाली दरड कोसळली आणि दगड एका यात्रेकरूच्या डोक्याला लागल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, भानुदा अश्रू आरडे (५२, रा. निमगाव, ता. माजलगाव, जि. बीड)असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर आल्यानंतर खाली उतरत असताना पर्वतावरच मृत्यूने त्यांना गाठलं. यावेळी या व्यक्तीच्या अंगावर तीन ते चार दगड पडल्याने हातपाय आणि डोक्याला जबर मार लागल्यामुळे गंभीर जखमी झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तत्काळ त्र्यंबक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ब्रह्मगिरीवरुन डोलीवाल्यांच्या सहकाऱ्याने मयत व्यक्तीस गंगाद्वार इथे आणले. त्यानंतर गंगाद्वारवरून त्र्यंबकराजा मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेतून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी रुग्णालयातील डॉ. प्रशांत पाटील यांनी जखमी रुग्णास तपासून मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात रवाना केला आहे.

याप्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गंगावणे हे करत आहेत. दरम्यान, दर्शन करून खाली उतरत असताना ब्रम्हगुफेजवळ अंदाजे ५० किलोचा दगड अंगावर कोसळल्याने भाविकाचा मृत्यू झाला आहे. बीडवरून नाशिक इथे दर्शनासाठी आलेले असताना त्यांच्यासोबत असा अपघात झाल्याने यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी देखील ब्रह्मगिरी पर्वतावर अशा घटना घडल्या आहेत. दरड कोसळून चार भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर काल बीड येथील एका यात्रेकरूचा दरड पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.