• Sat. Sep 21st, 2024
देवगडवरून आंबे घेऊन जोडपं मुंबईला निघालं, एका चुकीनं पतीने डोळ्यांदेखत पाहिला पत्नीचा अंत

रायगड/पेण : मुंबई-गोवा महामार्गावर आज पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला चार चाकीने मागून जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या महिलेचा पती किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने बचावला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पतीने आपल्या डोळ्यां देखत पत्नीचा शेवट पहिल्याने हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर त्यांची कार पोहचली तेव्हा त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे समोर असलेल्या गॅस सिलेंडरच्या गाडीवर त्यांची चारचाकी धडकेल्याने हा भीषण अपघात झाला. स्पृहा खवळे वय (वर्ष २४ रा. देवगड) ही महिला जागीच ठार झाली आहे. तर तिचा पती सुमित खवळे (वय वर्ष २८) हा जखमी झाला आहे. खवळे दांपत्य देवगडवरून मुंबईला आंबे घेऊन येत असताना मुंबई-गोवा महामार्गावर पेणनजीक हमरापुर इथे पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

Solapur Crime: सोलापूरचा अधिकारीच मास्टरमाईंड! साताऱ्याहून २ कंटेनर पुण्यात पाठवले, पोलिसांनी पाहणी करताच फुटला घाम…
या अपघाताचे वृत्त कळताच पेण-दादर सागरी पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सुट्टी असल्याने अनेक नागरिक आपल्या गावी गेले होते. खवळे दांपत्य देखील सुट्टी असल्याने आपल्या गावी गेले होते. देवगड येथून आपल्या मुंबईमधील नातेवाईकांसाठी त्यांनी आंबे आणले होते. गावावरून मुंबईला नेण्यासाठी ही आणलेली भेट दुर्दैवाने या महिलेसाठी अखेरची ठरली. मुंबई-गोवा महामार्गावर त्यांची कार पोहचली तेव्हा त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे समोर असलेल्या गॅस सिलेंडरच्या गाडीवर त्यांची चारचाकी धडकली.

Pune News : मैत्रिणीला इंप्रेस करण्यासाठी पोलीस बनला, एका चुकीने पुरता फसला; घटना वाचून खूप हसाल
दरम्यान, या भीषण अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या अपघातात अडकलेल्या दोन्ही वाहनांना बाजूला करून पेण दादर सागरी ठाण्याच्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे.

मित्रांसोबत मासे पकडण्यासाठी गेलेला तरुण अचानक गायब, २ दिवसांनी मगरीच्या पोटात सापडला अन्….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed