• Mon. Nov 25th, 2024

    साहेब असं करू नका, कुणाच्या याचना, कुणाच्या विनंत्या, कुणी पाया पडलं.. चव्हाण सेंटरमध्ये काय घडलं?

    साहेब असं करू नका, कुणाच्या याचना, कुणाच्या विनंत्या, कुणी पाया पडलं.. चव्हाण सेंटरमध्ये काय घडलं?

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार, असा निर्णय शरद पवार यांनी जाहीर करताच यशवंतराव चव्हाण सभागृह घोषणांनी दणाणलं. ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार… शरद पवार..’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. एवढचं नव्हे तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी शरद पवार यांना स्टेजवर जाऊन विनवनी केली. अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी यावेळी विनवनी केली आणि त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे शरद पवार यांच्या पाया पडले आणि पक्षाचा राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. यामुळे सभागृहा भावुक वातावरण निर्माण झालं.शरद पवारांसाठी यशवंतराव चव्हाण सेंटर स्तब्ध अन् भावुक झालं

    आमदार, कार्यकर्ते आणि नेते सतत सभागृहात घोषणा देत होते. शरद पवार हे सपत्नीक सभागृहात उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, खासदार, आमदार, नेते आणि कार्यकर्त्यांनी पवारांजवळ एकच गर्दी केली. शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. अंकुश काकडे, प्रकाश गजभिये यांनीही स्टेजवर जाऊन शरद पवारांचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका मांडली आहे.

    Sharad Pawar : भाकरी फिरवण्याची सुरुवात स्वत:पासून, निवडणुकीला उभे राहणार नाही, अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार
    शरद पवार यांनी आपला निर्णय घेण्यासाठी कार्यकर्ते आणि नेत्यांची सतत घोषणाबाजी सुरू होती. बराच काळ ही घोषणा बाजू सुरू राहिली. अखेर अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना बाजूला केलं. आणि भावुक झालेल्या सर्वांना शांत केलं. तसंच शरद पवार यांनी आताच्या आता निर्णय जाहीर करावा, अशी मागणी केली.

    अध्यक्षपदावरुन निवृत्त होतोय, राष्ट्रवादीचं पुढं काय करायचं, समितीनं ठरवावं, शरद पवारांनी नावं सुचवली
    निर्णयाचा फेरविचार करावा- फ्रफुल्ल पटेल

    साहेबांसाठी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आणि ज्वलंत आहे. हे सभागृहात दिसून आलं आहे. साहेबांनी कुणालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वांच्या भावनांचा विचार करता साहेबांनी निर्णयाचा फेरविचार करावा. आणि निर्णय घ्यावा, अशी विनंती प्रफुल्ल पटेल यांनी सर्वांच्या वतीने केली.

    Sharad Pawar : पहाटेचा शपथविधी अजितनेच घडवला, त्याला माझी सहमती नव्हती; शरद पवारांचा आत्मकथेतून खुलासा
    जयंत पाटील भावुक

    जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. शरद पवार यांना परस्पर निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार नाही. सर्व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घ्याव्यात. त्यांच्या अनुभवाचा फायदा इथून पुढे सर्वांना व्हावा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed