• Mon. Nov 25th, 2024

    कार्यकर्ते म्हणाले, दादा तुम्ही तरी साहेबांना समजावा… अजित पवार म्हणाले, फक्त एका कारणामुळे मी शांत

    कार्यकर्ते म्हणाले, दादा तुम्ही तरी साहेबांना समजावा… अजित पवार म्हणाले, फक्त एका कारणामुळे मी शांत

    मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. आणि यशवंतराव चव्हाण सेंटरमधील संपूर्ण वातावरणच बदललं. शरद पवार यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना, खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या बाजूला बसलेल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. फक्त तेच नव्हे, अनेक नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्याच्या दिसून आल्या. यावेळी अजित पवार सभागृहात सर्वांना शांत करताना दिसले.जयंत पाटील, अनिल देशमुख, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांच्यासह सर्व प्रमुख नेते भावुक झालेले दिसले. सर्वांनाच शरद पवार यांच्या निर्णयाने धक्का बसला आहे. पवार यांनी निर्णय जाहीर करता कार्यकर्त्यांनी घोषणा बाजी सुरू केली. शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध केला. साहेब निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत आम्ही सभागृह सोडणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी घेतली.

    घोषणाबाजीमुळे सभागृहात एकच गोंधळाचं वातावरण होतं. शरद पवार यांच्या समोर कार्यकर्ते भावुक झाले होते. यावेळी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, यासाठी एक एक करून राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी आपल्या भावना मांडल्या. जयंत पाटील, अनिल देखमुख, सुनिल तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, फौजिया खान, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    साहेब असं करू नका, कुणाच्या याचना, कुणाच्या विनंत्या, कुणी पाया पडलं.. चव्हाण सेंटरमध्ये काय घडलं?
    अजित पवार का बोलले नाहीत?

    कार्यकर्त्यांच्या तीव्र झालेल्या भावना पाहता समिती ठरवेल ते पवार साहेबांना मान्य असेल, असं अजित पवार म्हणाले. पण कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते. साहेबांनी कुणालाच सूचना किंवा विश्वासात घेतलेलं नाही. यामुळे साहेबांच्या निर्णयाने तुम्ही तसेच आम्ही स्तब्ध झालोय. तुम्ही भावुक झाले. तशाच आमच्या भावना आहेत, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. साहेबांनी निर्णय मागे घ्यावा, अशी विनंतीही पटेल यांनी केली.

    VIDEO: आमचे सगळ्यांचे राजीनामे घ्या, पण तुम्ही बाजूला जाऊ नका, जयंत पाटील धायमोकलून रडले
    एकएक करून अनेक नेत्यांनी आपल्या भावना आणि मत मांडलं. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी अजित पवारांना विनंती करण्याचा आग्रह केला. अजितदादा तुम्ही बोला, अजितदादा तुम्ही विनंती करा, अजितदादा साहेब तुमचं ऐकतील, तुम्ही विनंती करा, असं म्हणत अजित पवार यांना विनंती करण्याचा आग्रह केला. यानंतर अजित पवारांनी आपण का विनंती करत नाहीये ते स्पष्ट केलं. ‘अरे वेड्यांनो तुम्ही विनंती करू शकता. मी आणि सुप्रिया बोलायला लागलो, तर आम्हाला म्हणतील बस खाली. आम्हाला बोलू देणार आहेत का ते’, असं अजित पवार म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed