घराचे काम करताना किंवा रंगकाम करताना अनेकदा आपल्या जुन्या वस्तू अचानक सापडतात. हरवलेल्या, गहाळ झालेल्या वस्तू घराचे काम काढल्यानंतर हमखास सापडतात. मात्र एका व्यक्तीला घराचे काम करताना ५० लाख रुपये सापडले आहेत. मात्र, त्याचा हा आनंद क्षणभरच टिकला आहे.स्पेनमधील एका शहरात ही घटना घडली आहे. द मेट्रोने दिलेल्या वृत्तानुसार, एक व्यक्ती त्याच्या जुन्या घराचे बांधकाम हाती घेतले होते. त्याचवेळी त्याला भिंतीत नोटा सापडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्याने पूर्ण भिंतच तोडून टाकली. भिंत तोडून टाकल्यानंतर आत खूप साऱ्या नोटांचे बंडल सापडले. जवळपास ५० लाखांच्या नोटा भिंतीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अचानक धनलाभ झाल्यानंतर त्या व्यक्तीसह कुटुंबातील इतर व्यक्तीही आनंद झाला. त्यांनी लगेचच सापडलेले सगळे पैसे एकत्र गोळा करत त्यांनी बँकेत जमा करण्याचे ठरवले. मात्र बँकेत गेल्यावर त्यांना धक्काच बसला.
अचानक धनलाभ झाल्यानंतर त्या व्यक्तीसह कुटुंबातील इतर व्यक्तीही आनंद झाला. त्यांनी लगेचच सापडलेले सगळे पैसे एकत्र गोळा करत त्यांनी बँकेत जमा करण्याचे ठरवले. मात्र बँकेत गेल्यावर त्यांना धक्काच बसला.
तो व्यक्ती पैसे घेऊन बँकेत गेल्यावर त्याला कर्मचाऱ्यांनी इतके पैसे कसे सापडले याची विचारणा केली. तेव्हा त्यांनी घराचे दुरुस्तीचे काम करत असताना भिंतीत पैसे सापडले. मात्र, बँक कर्मचाऱ्यांनी पैसे जमा करुन घेण्यास नकार दिला. कारण, या नोटा स्पेनच्या चलनातून बाद झाल्या होत्या. त्यामुळं व्यक्तीच्या आनंदावर पाणी फिरले आहे.
दरम्यान, त्या व्यक्तीचे घर जवळपास चार दशके जुने आहे. अलीकडेच घराच्या दुरुस्तीचे काम करण्यात घेतलं होतं. याच दरम्यान त्यांना भिंतीत त्यांना पैसे सापडले.
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ; एकाच रिक्षात १५ ते २० विद्यार्थ्यांना कोंबून प्रवास