• Sat. Sep 21st, 2024
एका माजी आमदाराला हरविण्यासाठी ३ आजी-माजी आमदार मैदानात उतरले

चंद्रपूर : राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल वीस वर्ष शेतकरी संघटनेची सत्ता होती. शेतकरी संघटनेचा हा बालेकिल्ला खिळखिळा करण्यासाठी आजी, माजी तीन आमदार एकत्र आलेत. वीस वर्षाची सत्ता या तीन आमदारांनी खेचून आणली. भाजप -काँग्रेस युतीला घवघवीत यश मिळालं. १८ पैकी १४ जागा युतीने जिंकल्या आहेत. वीस वर्षापासून सत्ता असलेल्या शेतकरी संघटनेला केवळ तीन जागावर विजय मिळविता आला तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली.

चटप यांना शह देण्यासाठी आपसातील मतभेद विसरून आजी माजी आमदार एकत्र

काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांच्या राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा बाजार समितीत शेतकरी संघटनेचे वीस वर्षांपासून वर्चस्व होते. माजी आमदार तथा शेतकरी नेते अॅड. वामनराव चटप यांचा या विधानसभा क्षेत्रात आजही मोठा प्रभाव आहे. चटप यांना शह देण्यासाठी आपसातील मतभेद विसरून आजी माजी तीन आमदार एकत्र आले होते.

मुख्यमंत्र्यांना निरोप देताना पत्नीचे डोळे पाण्याने डबडबले, साताऱ्यातील इमोशनल VIDEO
आमदार सुभाष धोटे, भाजपाचे माजी आमदार अॅड. संजय धोटे, भाजप नेते तथा माजी आमदार सुदर्शन निमकर हे तीन आमदार माजी आमदार चटप यांच्या शेतकरी संघटनेच्या पॅनेलला पराभूत करण्यासाठी एकत्र आले होते. या तिघांनी शेतकरी संघटनेच्या बालेकिल्ल्यावर युतीचा झेंडा फडकविला. एका माजी आमदाराचा पराभव करण्यासाठी तीन आजी, माजी आमदारांनी ताकद लावली.

शरद पवार म्हणाले, भाकरी फिरवणार, पुढच्या काही तासातच रोहित पवारांची मोठ्या पदावर शिफारस!
पहिल्यांदाच काँग्रेस-भाजपची युती

त्यांनी उघडलेल्या या आघाडीला मोठे यश आले. राजुरा विधानसभा क्षेत्रात बाजार समितीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेस-भाजपची युती झाली. विधानसभा क्षेत्रात शेतकरी संघटनेच्या ताब्यात असलेली एकमेव बाजार समितीवरील वर्चस्व आज संपुष्टात आले.

राजकारणातील प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांना पाण्यात बघणारे नेते या निवडणुकीत एकत्र दिसले. बाजार समितीतील निवडणुकीतील निकालामुळे शेतकरी संघटनेला फटका बसला आहे. राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण अठरा जागापैकी भाजप -काँग्रेस युतीला १४ जागेवर विजय मिळाला आहे. शेतकरी संघटनेला केवळ तीन जागेवर विजय मिळवता करता आला. तर एका जागेवर अपक्षाने विजय मिळविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed