• Sat. Sep 21st, 2024

भवानीमातेच्या दर्शनाहून परतताना मधमाश्यांचा हल्ला, पुण्याच्या कुटुंबातील दहा जण गंभीर जखमी

भवानीमातेच्या दर्शनाहून परतताना मधमाश्यांचा हल्ला, पुण्याच्या कुटुंबातील दहा जण गंभीर जखमी

पुणे : पुणे जिल्ह्यात किल्ले सिंहगडाच्या जवळ असलेल्या खामगाव मावळ येथे एकाच कुटुंबातील दहा जणांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. दहाही सदस्यांचा मधमाश्यांनी चावा घेतला असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर किरकट वाडी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सांबरे वाडी परिसरात ही घटना घडली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील खामगाव मावळ येथील एक कुटुंब आणि त्यांचे काही नातेवाईक सांबरे वाडी येथे असणाऱ्या भवानी आईच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन झाल्यावर त्यांच्यावर मधमाश्यांनी अचानक हल्ला चढवण्यास सुरुवात केली. अचानक एवढ्या मधमाश्या आल्याने कुटुंब भेदरले. माश्यांनी त्यांच्या संपूर्ण शरीरावर चावा घेऊन त्यांना अस्वस्थ केले.

वारसासाठी प्राध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार, मुलगा होताच सोडून द्यायचं, बंडगर दाम्पत्याचा प्लॅन
या घटनेची माहिती कुटुंबातील इतर व्यक्तींना मिळाली. मधमाश्यांनी चावा घेतल्यावर अनेक जण जमिनीवर अत्यवस्थ अवस्थेत पडलेले होते. त्या सर्वांना बऱ्याच वेळानंतर सिंहगड रस्त्यावरील किरकट वाडी फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला; व्हिडीओद्वारे चाहत्यांशी साधला संवाद

या घटनेची माहिती जिल्हा परिषदेचे विशेष कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना मिळाल्यानंतर त्यांनी आरोग्य विभाग, पोलिस प्रशासनाला तातडीने माहिती दिली. त्यानंतर प्रशासनाकडून सूत्र हलविण्यात आली आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळत आहेत.

साखरपुड्यानंतर भावी पत्नीला महाबळेश्वरला नेत लैंगिक अत्याचार, पिंपरीतील बापलेकावर गुन्हा
उन्हाळ्याचे दिवस असल्याने मधमाश्या मोठ्या प्रमाणावर बाहेर पडताना पहायला मिळतात. दाट झाडी, दगडाच्या कडे कपारीत हे मधमाश्यांचे पोळे बसलेले असते. त्यामुळे ते कधी उठेल आणि आणि कुणाच्या अंगावर येईल हे सांगणे तेवढेच कठीण आहे. देव दर्शन घेऊन निघण्याच्या तयारीत असलेल्या संपूर्ण कुटुंबावर अशाचप्रकारे मधमाश्यांनी हल्ला केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed