• Mon. Nov 25th, 2024

    डॉक्टरचा ३२ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील क्लिनिकमध्येच धक्कादायक प्रकार

    डॉक्टरचा ३२ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील क्लिनिकमध्येच धक्कादायक प्रकार

    पुणे : ३२ वर्षीय महिलेशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवून, तिची इच्छा नसतानाही वारंवार पाठलाग करत मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील मांगडेवाडी कात्रज या ठिकाणी कल्पना आनंद क्लिनिकमध्ये प्रकार घडला आहे. ही घटना १ जुलै २०२२ पासून आतापर्यंत घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित महिलेने डॉक्टर विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केल्याची माहिती शुक्रवारी दिली आहे.डॉ. अमित आनंदराव दबडे (वय २९ वर्ष, रा. आंबेगाव खुर्द, पुणे) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

    वारसासाठी प्राध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार, मुलगा होताच सोडून द्यायचं, बंडगर दाम्पत्याचा प्लॅन
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी डॉक्टर अमित दबडे याचे कात्रज परिसरात मांगडेवाडी या ठिकाणी कल्पनानंद क्लिनिक आहे. सदर क्लिनिकमध्ये तपासणी करण्याकरीता पीडित महिला आल्यानंतर, त्याची तिच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर डॉक्टरने महिलेचा मोबाईल क्रमांक घेऊन तिला मोबाईल फोनवर मेसेज आणि कॉल करून तिच्याशी गोड गोड बोलून त्याच्या हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतले. त्यानंतर तिचा हात धरून तिच्या छातीला हात लावून परत सदर प्रकाराबाबत माफी मागण्याच्या बहाण्याने तिला क्लिनिकमध्ये बोलावले.

    नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

    त्यानंतर तिला इंजेक्शन घेण्यासाठी कमरेवरचे कपडे खाली करण्यास सांगत, त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने तिची संमती नसतानाही शारीरिक संबंध करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतरही महिलेची इच्छा नसताना तिचा वारंवार पाठलाग करून तिला डॉक्टरने त्रास दिला. अखेर याबाबत महिलेने पोलिसांकडे धाव घेत, डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एस तावडे याबाबत पुढील तपास करत आहेत.

    साखरपुड्यानंतर भावी पत्नीला महाबळेश्वरला नेत लैंगिक अत्याचार, पिंपरीतील बापलेकावर गुन्हा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *