Chhatrpati Sambhajinagar News: पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध ‘पोक्सो’सह कडक कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मावस भावाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती(फोटो– Lipi)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कौटुंबिक नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच २० वर्षीय मावस भावाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली असून, मुंबई येथे उपचारादरम्यान तिचा गर्भपात झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. सदर तरुणीच्या तक्रारीवरून आता आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीवर २२ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान तिच्या मावस भावाने वारंवार लैंगिक अत्याचार केले. घटनेच्या वेळी मुलगी अल्पवयीन होती. काही दिवसांनंतर पीडित मुलगी मुंबई येथे गेली असता तिला अस्वस्थ वाटू लागले. मुंबईतील रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पीडितेवर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा गर्भपात झाला. या घटनेमुळे धक्का बसलेल्या पीडित मुलीने घडलेला प्रकार सांगितला. अत्याचाराची घटना वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने मुलीने येथे येऊन आपबिती कथन करत फिर्याद दिली.
’पोक्सो’ कायद्यानुसार कडक कारवाई
पीडितेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत वाळूज एमआयडीसी पोलिसांनी संशयित मावस भावाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. कायदेशीर बाबींचा विचार करून आणि पीडित अल्पवयीन मुलीची ओळख संरक्षित ठेवण्यासाठी आरोपीचे नाव व तपशील गोपनीय ठेवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा