पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून शरद लाड, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) प्रताप ऊर्फ भैय्या माने यांच्या नावांची चर्चा आहे. शिक्षक मतदारसंघातही शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे) मंगेश चिवटे आणि प्रा. डॉ. सचिन सानप यांची नावे चर्चेत आहेत. भाजपने शिक्षक मतदारसंघावरही दावा ठोकल्याने महायुतीतील वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भाजपकडून अरुण लाड यांचे चिरंजीव शरद यांच्या नावाची चर्चा असून, त्यांनी संपर्क सुरू केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रताप ऊर्फ भैय्या माने यांचे नाव पुढे आले आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी तसे जाहीरही केले आहे.
Baramati Elections : पवार विरुद्ध पवार, संपूर्ण राज्याचं लक्ष केंद्रीत करणारी निवडणूक, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात काय घडणार?इच्छुक सक्रिय
शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे) मंगेश चिवटे आणि प्रा. डॉ. सचिन सानप यांच्या नावांची चर्चा आहे. चिवटे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, तर सानप हे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत. या मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर आहेत. याशिवाय भाजपकडून कौस्तुभ गावडे यांच्या नावाचा आग्रह धरण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.
Pune MPSC Student | काही MPSC विद्यार्थ्यांचा रोहित पवारांवर निशाणा,आंदोलनात दोन गट?
जागावाटपानंतर चित्र स्पष्ट
महायुतीतील घटक पक्षांकडून स्वतंत्रपणे इच्छुकांची नावे पुढे येत असली, तरी अंतिम उमेदवारी आणि जागावाटपाबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणे अपेक्षित आहे. त्यानंतरच कोणत्या पक्षाचा उमेदवार कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, हे स्पष्ट होईल. दरम्यान, महाविकास आघाडीकडूनही दोन्ही मतदारसंघांसाठी तयारी सुरू आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चित झाल्यानंतर निवडणुकीतील प्रमुख लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
पदवीधरसाठी इच्छुक
शरद लाड (भाजप)
प्रताप माने (राष्ट्रवादी काँग्रेस)
‘शिक्षक’मधील इच्छुक
मंगेश चिवटे, सचिन सानप
(शिवसेना)
कौस्तुभ गावडे (भाजप)
