• Mon. Nov 25th, 2024
    तुम्ही येथे का थांबले? निघून जा; कल्याणमध्ये वाटेतच मित्र-मैत्रिणीवर चाकूने हल्ला

    ठाणे: कल्याणच्या पूर्वेकडील रेल्वे वसाहतीजवळ एका अनोळखी इसमाने कोणतेही कारण नसताना अचानक एक तरूण आणि त्याच्या मैत्रिणीवर मारहाण करत चाकूने सपासप वार केले. या चाकू हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत. या संदर्भात जखमी तरुण-तरुणीने दिलेला तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी अनोळखी हल्लेखोराच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.

    या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागातील साई सहारा कॉम्प्लेक्समध्ये राहणारा मयूर राजू नाईक (वय २७) हा तरूण मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजता आपल्या मैत्रिणीसह कल्याण पूर्व रेल्वे स्थानक भागात दुचाकीवरुन आला. दुचाकीवरुन येत असताना हातातील पिशवी मैत्रिणीकडून पेलवत नव्हती. त्यासाठी मयूरने रेल्वे वसाहतीजवळ दुचाकी आपली थांबवली.

    दादर-प्रभादेवीसह तीन ठिकाणी पूरस्थिती टळणार, अतिमुसळधार पावसातही पाण्याचा निचरा होणार, कारण…
    मैत्रिणीकडील जड पिशवी दुचाकीच्या पुढील भागात ठेवण्याचा प्रयत्न मयूरने केला. इतक्यात तेथे एक जण आला. “तुम्ही येथे का थांबले? येथून निघून जा”, अशी त्याने धमकी दिली. त्यावर “तुला काय करायचे, आम्ही येथून जातोय”, असं मयूरने उत्तर देताच भडकलेल्या त्या अनोळखी इसमाने मयूरच्या कानशिलात लगावली. त्यानंतर शिवीगाळ करत त्याने खिशातून काढलेल्या चाकूने मयूरवर हल्ला केला.

    हा प्रकार पाहून घाबरलेल्या मैत्रिणीने दुचाकीवरून उतरून मयूरशी होत असलेला प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या अनोळखी इसमाने त्याच्या मैत्रिणीवरही चाकूने हल्ला चढवला. हा सारा प्रकार घडत असताना मयूर आणि त्याच्या मैत्रिणीला वाचविण्यासाठी कुणीही धाऊन आलं नाही. अनोळखी इसमाने तेथून पळ काढल्यानंतर जखमी अवस्थेत मयूर याने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला सांगितला. या संदर्भात पोलिसांनी मयूरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून त्या माथेफिरूचा शोध सुरू केला आहे.

    अभिजात मराठीची घोषणा महाराष्ट्र दिनी व्हावी; अजित पवारांची सरकारकडे मागणी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed