कंटेनरच्या बाजूला आडोसा घेतला, तिथेच घात झाला
जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळ नवीन शासकीय हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकामाचे काम सुरू आहे. या बांधकामाचं कंत्राट पुण्यातील न्याती कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले असून गेल्या जानेवारीपासून या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. या ठिकाणी बिहार राज्यातील काही मजूर हे दोन महिन्यांपासून काम करत आहेत. गुरूवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अवकाळी वादळ आले. आलेल्या मोठ्या वादळापासून जीव वाचविण्यासाठी येथील मजूर पत्र्याच्या शेडमध्ये गेले. परंतू वादळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने पत्र्याचे शेड देखील उडाले. त्यामुळे शेडमधील मजुरांनी हे पटांगणात उभ्या असलेल्या कंटेनरच्या बाजूला आडोसा घेतला.
भेंडवळची भविष्यवाणी, ३५० वर्षांपासूनची परंपरा; पाऊस, शेती, राजकारण सगळ्यांचं रहस्य उलगडणार
क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करून मृतदेह काढले बाहेर
यादरम्यान, अचानक सुसाट वेगाने वाऱ्याला सुरुवात झाली या वादळी वाऱ्यामुळे उभा कंटेनर देखील पलटी झाला. त्यामुळे या कंटेरनखाली आडोशाला उभे असलेले भोला श्रीकुसूम पटेल आणि इंजिनिअर चंद्रकांत वाभळे हे दोघे दाबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला अफरोज आलम हा जखमी झाला. जखमीला तातडीने जिल्हा शाासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तर क्रेनच्या मदतीने कंटेनर बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आले.
ही घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत भोला हा गेल्या दोन महिन्यांपासून कंत्राटी पध्दतीने कामाला होता. गावातील काही मित्रांसोबत तो कामाला आलेला होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. तर चंद्रकांत वाभळे हे इंजिनिअर म्हणून न्याती कंपनीत नोकरीला होते, गेल्या १५ दिवसांपासून या ठिकाणी कामावर हजर झाले होते, अशी माहिती मिळाली आहे.