परभणी: परभणी मध्ये काल झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून परभणीच्या सेलू तालुक्यात महिला शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकाला फाटा देत आंब्याची फळबाग लागवड केली होती. आंब्याच्या बागेतील २०० झाडांचे आंबे गळून पडले असल्याने महिला शेतकऱ्याचे आठ ते दहा लाखाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मायबाप सरकारने तात्काळ आंब्याच्या वनात पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यांनी केली आहे. हाता- तोंडाशी आलेला घास गेला असल्याने आता शेतकऱ्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.परभणीच्या सेलू तालुक्यातील कुपट येथील महिला शेतकरी मीराताई सोळंके शेतीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करायचा म्हणून पारंपारिक पिकाला फाटा देत पाच एकर शेतामध्ये दोनशे आंब्याची फळबाग लागवड केली. यामधून त्यांना वर्षासाठी आठ ते दहा लाख रुपयांचा नफा मिळत होत. अशातच काल सेलू तालुक्यातील कुपटा परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिट झाली. त्यामुळे महीला शेतकरी मीराताई सोळंके यांच्या शेतातील आंब्याच्या बागेतील २००झाडांचे आंबे गळून पडले असल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.
वाशी रेल्वे स्थानकालगत आढळलेल्या मृतदेहाचे अखेर गूढ उकलले, पोलिसांनी तीन दिवसात लावला छडा
दोनशे आंब्याच्या झाडावरून त्यांना या वर्षी मिळणाऱ्या दहा लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामूळे मायबाप सरकारने तात्काळ पंचनामे करुन अर्थिक मदत द्यावी अशी मागणी महिला शेतकरी मीराताई सोळंके यांनी केली आहे.लालबाग हत्याकांड; पत्नीमुळं घेतला टोकाचा निर्णय, मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळं गूढ उकललं
कुपटा परिसरात प्रचंड नुकसान
काल कुपटा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे कोलमडून पडली आहेत. यासोबतच विजेचे खांब देखील कोलमडून पडले अहेत. त्यामूळे कुपटा आणि परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला असल्यामुळे नागरिकांना भर उन्हाळ्यामध्ये प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महावितरणने तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जाते.
भटक्या कुत्र्यांना काठीने घाबरवणे व हुसकावणे ही क्रूरता; उच्च न्यायालयाचे निरीक्षण