छत्रपती संभाजीनगर :शहरातील सातारा परिसरातील एका शोरूम येथील सर्व्हिसिंग सेंटर मध्ये गाडी धुण्याचे काम करत असताना अचानक विजेचा शॉक लागून काम करणाऱ्या ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बीड बायपास परिसरातील शोरूम मध्ये मंगळवारी, २५ ए्प्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली. दरम्यान घटनेमुळे या तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शैलेंद्र राजेंद्र सरनाईक (वय ३१ वर्षे, रा. माता मंदिर, गवळीपुरा छावणी) असे विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. शैलेंद्र हा गेल्या अनेक वर्षांपासून छावणी भागांमध्ये राहत होता. त्याला आई-वडील नाहीत. काही वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याची पत्नी गृहिणी आहे. त्याला चार वर्षाचा एक मुलगा देखील आहे.
शैलेंद्र हा बीड बायपास परिसरातील शरयू या कारच्या शोरूममध्ये कर्मचारी म्हणून काम करत होता. या नोकरीवर त्याचा उदरनिर्वाह चालत असे. दरम्यान मंगळवार दिनांक २५ एप्रिल रोजी शैलेंद्र हा नियमित काम करण्यासाठी घरातून निघाला. दिवसभर त्याने शोरूममध्ये काम देखील केलं. दरम्यान, सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शैलेंद्र हा शोरूममध्ये कार धुण्याचे करू लागला. तो हे काम वॉशिंग सेंटर मध्ये करू लागला.

हे करत असलेले काम तो नियमितपणे करत आलेला आहे. मात्र हे काम करता करता त्याला अचानक विजेच्या धक्का लागला. यामध्ये तो खाली कोसळला. ही बाब सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या लक्षात येत असल्याने तत्काळ विद्युत पुरवठा खंडित करून त्याला घाटी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.
सरनाईक कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे सरनाईक कुटुंबाचा घरातील कर्ता व्यक्ती गेला आहे यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.