• Sat. Sep 21st, 2024

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा आटोपून परतत होते, कुटुंबासह कार २० फूट दरीत कोसळली

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा आटोपून परतत होते, कुटुंबासह कार २० फूट दरीत कोसळली

रायगड:रायगड जिल्ह्यात मुरुड राजवाडा परिसरात मध्यरात्री दरीत कार कोसळली. मुरूड राजवाड्याच्या उतारावर घरी परत येत असताना बुधवारी (२६ एप्रिल) रोजी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास मुरूडमधील इर्टिका कारला अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे. ही गाडी १५ ते २० फूट खाली पडली. यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले. नुकताच विवाह सोहळा झलेल्या मुलीच्या सासरी हे कुटूंब पूजेसाठी गेले होते, त्यावेळी हा दुर्दैवाने मोठा अपघात झाला.डांगे यांच्या कुटुंबातील मुलीचा नुकताच विवाह सोहळा पार पडला होता. दुसर्‍या दिवशी मुलीच्या सासरी सत्यनारायणाची पूजा होती. त्या निमित्ताने डांगे कुटुंब मुलीच्या सासरी पुजेसाठी गेले होते. तेथून रात्री परत येत असताना राजवाडा सोडल्यावर उतारावर अचानक गाडीचा वेग वाढल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.
खेळताना काठोकाठ भरलेल्या विहिरीत पडला, पुण्यात ६ वर्षांच्या साईने तडफडून जीव सोडला
अपघातावेळी कारमधील गीतांजली गजानन डांगे, संपदा जनार्दन मळेकर, सारिका सुभाष मेहता, संगीता सुभाष गुरव, सचिन सुभाष गुरव, नितेश नंदकुमार जंजीरकर, विराज गजानन डांगे हे सात जण या गाडीत होते. यातील तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत तर गीतांजली डांगे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर ती पनवेल परिसरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

१५ वर्षानंतर शिक्षकाला पहिला पगार मिळाला, घरी पोहोचतानाच काळाने गाठलं, मुलासह प्रवास थांबला

गाडी समुद्राच्याबाजुला असलेल्या संरक्षक कठड्यावरुन पलटी मारत खाली कोसळली. गाडीतून सहाजण प्रवास करीत होते. त्यापैकी तिघे जखमी झाले. त्यांना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाला काही तपासण्या करण्याकरीता मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या सगळ्या अपघाताची नोंद जंजिरा मुरुड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या सगळ्या अपघाताचा अधिक तपास मुरुड पोलीस करत आहेत.

विहिरीत तीन मुलींचे मृतदेह, आईनेच केला खून, नातेवाईक म्हणतात – तिला तर भूतबाधा झालेली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed