• Mon. Nov 25th, 2024

    खेळताना काठोकाठ भरलेल्या विहिरीत पडला, पुण्यात ६ वर्षांच्या साईने तडफडून जीव सोडला

    खेळताना काठोकाठ भरलेल्या विहिरीत पडला, पुण्यात ६ वर्षांच्या साईने तडफडून जीव सोडला

    पुणे:खेळताना विहिरीत पडून ‌६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी येवलेवाडीतील अंतुले नगर येथे घडली. विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली असल्याने विहिरीतून मुलाचा मृतदेह काढण्यास अग्निशमन दलाला तीन तास लागले. साई भगवान यादव (वय ६, रा. अंतुले नगर) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे ‌नाव आहे. या घटनेची कोंढवा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात‌ आली आहे.साई घराजवळील विहिरीजवळ बुधवारी दुपारी दीड वाजता खेळत होता. विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली होती. विहिरीला जाळी होती. मात्र, पाणी उपसण्यासाठी जाळीचा काही भाग उघडा होता. साई खेळता-खेळता या खुल्या जागेतून विहिरीत पडला. तिथे कपडे धुणाऱ्या एका महिलेने हा प्रकार पाहिला. तिने आरडाओरड केल्याने नागरिक जमा झाले. विहीर काठोकाठ भरल्याने कोणालाही विहिरीत उतरता येत नव्हते. कोंढवा पोलिस ठाण्यातील हवलदार विठ्ठल राऊत यांनी हवेली तहशीलदार यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्राला कळवले.

    विहिरीत तीन मुलींचे मृतदेह, आईनेच केला खून, नातेवाईक म्हणतात – तिला तर भूतबाधा झालेली…
    या घटनेबाबत दुपारी पावणे दोन वाजता अग्निशमन दलाला माहिती मिळाल्यानंतर दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी साईचा शोध सुरू केला. मात्र, पाण्याचा दाब तीव्र असल्याने आणि खाली गढूळ पाणी असल्याने शोध घेण्यात अडचणी येत होत्या. मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे विजय शिवतारे यांनी पन्नास फूट खोल पाण्यात जाऊन सायंकाळी पाच वाजता साईला बाहेर काढले. मात्र, खूप वेळ पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला होता, असं केंद्र प्रमुख समीर शेख यांनी सांगितले.

    छ. संभाजीनगरमध्ये निर्भया हत्याकांड; पीडित महिलेच्या रडणाऱ्या लेकरांना कुशीत घेत अंबादास दानवेंनी दिला धीर

    साईचे आई-वडील मजुरीचे काम करतात. साईच्या पालकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अवघा सहा वर्षांचा मुलगा गेल्याने यादव दाम्पत्यावर या घटनेने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. समीर शेख, योगेश जगताप, रवींद्र हिवरकर, अनिल खरात, शौकत शेख, तेजस खरिवले, अभिजित थळकर. किशोर मोहिते, योगेश पिसाळ शंकर नाईकनवरे आणि सागर निकम यांच्यासह मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे, विजय शिवतारे, हनुमंत नवले, अजय यादव, प्रसाद कुलकर्णी यांनी मदतकार्य राबवले.

    मुलगा घरात आला, वडिलांना पाहून किंचाळला; पत्नी आणि आई धावून आली, तोपर्यंत सारं संपलेलं…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed