मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या अनधिकृत मशीद, मजार आणि मदरसांचा मुद्दा उपस्थित केल्या नंतर मनसेचे ठाणे पालघर जिल्हा प्रमुख तथा मनसे नेते अविनाश जाधव यांनी देखील ठाण्यातील मुंब्रा येथील वनविभागाच्या जागेवरील अनधिकृत मशीद, मजार आणि मदरसांचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा या मशीद, मजार आणि मदरसांच्या शेजारी मंदिर उभारण्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिला होता. त्या साठी अविनाश जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना दिल होत. मात्र या दरम्यान मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु होता. यावेळी अविनाश जाधव यांनी कुठलेही पाऊल उचलून मुंब्रा येथील वातावरण दंग होऊ नये आणि कायदा सु व्यवस्थेचा प्रश्न निर्मण होऊ नये यासाठी पोलीसांकडून अविनाश जाधव यांना रमजान महिना संपेपर्यंत अविनाश जाधव यांना मुंब्रा मध्ये येण्यास बंदी घातली होती. २३ एप्रिल पर्यंत अविनाश जाधव यांना मुंब्रा मध्ये बंदी घालण्यात आली होती.
रमजान महिना संपल्यानंतर अविनाश जाधव यांनी मंगळवारी रात्री मुंब्रा मध्ये हजेरी लावली आणि यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांचे जंगी स्वागत देखील करण्यात आले. मनसे पदाधिकाऱ्यांना मुंब्रा मध्ये खूप त्रास होत असल्यामुळे आपण त्यांना भेटी साठी आलो असल्याचे जाधव यांनी यावेळी सांगितले. मात्र मंगळवारी अविनाश जाधव यांनी मुंब्रा मध्ये हजेरी लावल्यानंतर पोलिसांनी आता पुन्हा त्यांच्या मुंब्रा नो एंट्री मध्ये वाढ केली आहे. पोलिसांनी पुन्हा एकदा कलम १४४ कायदा लागू करण्यात आला असून २७ एप्रिल रात्री ००.०१ ते ०९ मे २४.०० वाजे पर्यंत पुन्हा एकदा अविनाश जाधव यांना मुंब्रा येथे येण्यास बंदी घालण्यात आली आहे.