• Mon. Nov 25th, 2024
    पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! येत्या गुरुवारी पाणीपुरवठा बंद; शहरातील या भागात पाणी नाहीच

    पुणे: महापालिकेची विविध जलशुद्धीकरण केंद्रे आणि टाक्यांच्या अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीसाठी येत्या गुरुवारी (२७ एप्रिल) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. या बंद कालावधीत जलकेंद्रात विद्युत / पंपिंगविषयक आणि स्थापत्य विषयक तातडीची कामे केली जाणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी दिली.

    पाणी बंद राहणारा भाग :

    पुणे शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन, मॉडेल कॉलनी परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती, सहकारनगर, सातारा रस्ता, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, एसएनडीटी, एरंडवणे, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नं. ४२-४६ (कोंढवा खुर्द), पर्वती टॅँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरूगणेशनगर, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर,वारजे-माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध, बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता परिसर, लष्कर भाग, पुणे स्थानक, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स, वानवडी, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रस्ता आणि सर्व समाविष्ट गावे.
    दारुड्या बापाकडून आईला मारहाण, एके दिवशी कहरच झाला; संतप्त पोरानं छातीत चाकू खुपसला अन्…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed