• Mon. Nov 25th, 2024

    वर्गमित्राची भेट घेतली, मग ITIचे सात मित्र गोदावरीत पोहायला गेले, काही वेळाने दोघे दिसेना अन्…

    वर्गमित्राची भेट घेतली, मग ITIचे सात मित्र गोदावरीत पोहायला गेले, काही वेळाने दोघे दिसेना अन्…

    नांदेड:नांदेडमध्ये आयटीआयचं शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन विध्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी नांदेड तालुक्यातील राहटी शिवारात ही दुर्देवी घटना घडली. शंकर धोंडिबा कदम (वय १९ रा. अटकळी ता बिलोली) आणि शिवराज सुरेश कदम (वय १९ रा. पुयडवाडी, नांदेड ) असं या मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.नांदेड शहरात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहे. या आयटीआयमध्ये शहरासह तालुक्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असतात. बिलोली तालुक्यातील आटकळी येथील १९ वर्षीय शंकर कदम आणि नांदेड तालुक्यातील पुयडवाडी येथील १९ वर्षीय शिवराज कदम हे दोघे देखील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेत होते. सोमवारी दुपारी मृतांसह इतर पाच जणांनी राहाटी येथे वर्ग मित्राच्या घरी जाण्याचा प्लॅन केला. सोमवारी दुपारी सातही मित्र राहाटी येथे आपल्या मित्राच्या घरी गेले होते. मित्राची भेट झाल्यानंतर हे सातही जण पोहण्यासाठी गोदावरी नदी पात्रात गेले.
    पुण्याला जाताना गाडी दुभाजकाला धडकून तीनदा पलटी, आई वडिलांसमोरच ३ वर्षीय श्रीयांशने जीव सोडला
    सर्वजण नदीमध्ये पोहण्याचा आनंद घेत होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने शंकर कदम आणि शिवराज कदम हे दोघे नदीमध्ये बुडाले. दोघे जण पाण्यात बुडाल्याचे समजताच इतर मित्रांना धक्का बसला आणि त्यांनी त्या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांचा शोध काही लागला नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गोदावरी जीवरक्षक दलाच्या जवानांना पाचारण केले.

    नवनिर्वाचित सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; भर चौकात आधी रेकी, काहीच मिनिटांत हल्ला

    तीन तासाच्या अथक परिश्रमाने गोदावरी जीवरक्षक दलाच्या जवानांनी सायंकाळपर्यंत शोध घेऊन दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. या घटनेने मृत शंकर कदम आणि शिवराज कदम यांच्या कुटुंबियांवर दुःखाच डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या प्रकरणी लिंबगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होतआहे.

    २००० वर्ष जुना खजिना सापडला, जमिनीत पुरलेला होता, पाहून पुरातत्त्वशास्त्रज्ञ भलतेच खूश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed