बिर्ला समूहाची नवीन खरेदी
दस्तऐवजानुसार, एन पालिया, दारियस सोराब कंबट्टा, सायरस सोली नलसेठ, हिरजी जहांगीर, चेतन महेंद्र शाह यांचे कार्यकारी अधिकारी एर्नी खरशेदजी दुबाश यांच्या इस्टेटमधून ही मालमत्ता संपादित करण्यात आली आहे. यापूर्वी देखील बिर्ला समूहाने अशा प्रकारे कोट्यवधींच्या मालमत्ता खरेदी केल्या आहेत. २०१५ मध्ये त्यांनी मलबार हिलच्या लिटल गिब्स रोडवरील प्रतिष्ठित जाटिया हाऊस विकत घेतले असून या बंगल्याची किंमत ४२५ कोटी रुपये आहे. सध्या बिर्ला कुटुंबीय या घरात राहतात. या घरात २० हून अधिक खोल्या असून या घराचे छत सागवान लाकडाची बनली आहे. तसेच सौंदर्याच्या बाबतीत देखील घर राजा-महाराजांच्या महालापेक्षा कमी नाही. त्याचप्रमाणे त्यांनी गेल्या काही वर्षांत अशाच प्रकारच्या हाय-प्रोफाइल मालमत्ता खरेदी केल्या आहेत.
कोण आहेत कुमार मंगलम बिर्ला?
भारतीय अब्जाधीश आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांचा जन्म १४ जून १९६७ रोजी एका मारवाडी कुटुंबात झाला. त्यांचे वडील आदित्य विक्रम बिर्ला देखील देशातील मोठे उद्योगपती होते. बीकॉम आणि एमबीए शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुमार मंगलम वयाच्या २८व्या वर्षी समूहातील कामकाजात रुजू झाले. १९९५ मध्ये वडिलांच्या अकाली निधनानंतर समूहाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्षपद हाती घेतल्यानंतर कुमार मंगलम बिर्ला यांनी अनेक क्षेत्रात आपला व्यवसाय पसरवला आणि आता ते हळूहळू मुलांना व्यवसायात सोपवत आहेत.