• Mon. Nov 25th, 2024

    नामीबियातून भारतात आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू, महिनाभरात दुसरी घटना, कारण अस्पष्ट

    नामीबियातून भारतात आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू, महिनाभरात दुसरी घटना, कारण अस्पष्ट

    मध्य प्रदेशःकुनो राष्ट्रीय उद्यानातून आणखी एक वाईट बातमी आली आहे. काही दिवसांपूर्वी साशा या मादी चित्त्याचा मृत्यू झाला होता. तर, आता महिन्याभराने आणखी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. हा नर चित्ता असून त्याचं उदय असं नामकरण करण्यात आले होते.मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण अफ्रिकेतील नामीबियातून १२ चित्ते आणण्यात आले होते. त्यातील साशा या मादी चित्त्याचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला होता. तर, आता महिनाभराच्या कालावधीने उदय या चित्त्याचा मृत्यू झाला आहे. उदयचे वय सहा वर्ष इतके होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शनिवारी त्याची तब्येत ठणठणीत होती. रविवारी अचानक त्याच्या प्रकृतीत बिघाड झाला आणि त्याचा मृत्यू झाला. आज त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतरच त्याच्या मृत्यूचे खरे कारण कळू शकणार आहे.

    अजब कारभार! अधिकाऱ्याला निवृत्तीच्या दिवशी मिळाली पदोन्नती, थेट मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र
    साशाला किडनीचा आजार होता त्यामुळं तिचा मृत्यू झाला होता. मात्र उदयच्या मृत्यमुळं अधिकारीही विचारात पडले आहेत. रविवारी त्याची तब्येत अधिक बिघडल्यानंतर त्याला क्वारंटाइन करण्यात आलं होतं. तसंच, औषधं आणि सलाइनदेखील देण्यात येत होते. रविवारी सकाळी तज्ज्ञांचे पथक कुनोमध्ये पोहोचल्यावर त्यांनी जेव्हा उदयला पाहिले तेव्हा तो खूपच थकलेला अवस्थेत होता. मान खाली खालून तो एका जागेवर बसला होता. तसंच, जेव्हा तो उठून चालायला लागला तेव्हा त्याला धड चालताही येत नव्हते. चालताना त्याची मान खाली वाकलेली होती., अशी माहिती मिळाली आहे आज उदयचं शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या आजाराचे कारण कळू शकणार आहे. सुरुवातीला आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार, चित्त्यांना भारतातील हवामानासोबत जुळवून घेणं कठिण जात असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

    सी-लिंकवर पहाटे बाईकची रेस लावली, दुचाकीतही फेरफार; पोलिसांनी २० जणांच्या मुसक्या आवळल्या
    दरम्यान, भारत सरकारने दक्षिण अफ्रिकेतून १२ चित्ते भारतात आणले होते. १८ फेब्रुवारी रोजी त्यांना मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले होते. दरम्यान, महिन्याभरात दोन चित्त्याचा मृत्यू झाल्याने सरकारच्या प्रोजेक्ट चितावर सवाल उपस्थित केले जात आहेत.

    वन विभागाला सांगितले बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आढळलं भलतच, शेतकऱ्याच्या मृत्यूचे गूढ

    नामिबियातून ८ चित्ते भारतात दाखल, पंतप्रधान मोदींच्या हस्ते केलं रिलीज

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *