• Wed. Mar 11th, 2026
    बायकोचा अंडा फ्राय बनवून देण्यास नकार; संतापलेल्या नवऱ्याने केलं असं काही…

    बीड: पती-पत्नीमधील वाद काही नवे नाहीत. प्रत्येक पती -पत्नीत भांडणं हे होत असतात. जेवणात काही कमी जास्त झालं तर पती पत्नीवर ओरडत असतो. पण बीडमध्ये एका पतीने तर चक्क हद्दच केली. त्याच्या बायकोने त्याला अंडा फ्राय दिलं नाही म्हणून तिला भयंकर शिक्षा दिली असल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. बीडमधील अंबाजोगाई येथील ही धक्कादायक घटना आहे.

    पतीने आपल्या पत्नीला अंडा फ्राय बनवायला सांगितलं. पण तिने त्याला नकार दिल्याने त्याला राग अनावर झाला आणि त्याने धक्कादायक पाऊल उचलले. आपल्या पत्नीने अंडा फ्राय बनवून खायला दिलं नाही म्हणून तो प्रचंड संतापला. त्याने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपी पतीने तिच्या डोक्यावर जोरदार काठीने वार केला आणि त्यात ती गंभीर जखमी झाली.

    अजिंक्य रहाणेच्या त्या एका भन्नाट शॉटने जिंकली सर्वांची मनं, फोटो झाले जगभरात व्हायरल…
    हा वाद शेवटी पोलीस ठाण्यात पोहोचला. अंडा फ्रायवरुन पतीने मारहाण केल्यानंतर पत्नीने पोलीस ठाणे गाठत आपल्या पतीविरोधात तिने तक्रार दिली. पत्नीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, क्षुल्लक कारण हे जिवावर देखील बेतू शकतं हे या वादातून पुढे आलं आहे. या वादामध्ये हसावं की किती गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष द्यावे हे मात्र अवघड आहे.

    चोरलेलं धनुष्य बाण घेऊन या, माझ्या नावासह मैदानात येतो,निवडणुका लावा, उद्धव ठाकरेंचं चॅलेंज

    सुरूर-वाई-महाबळेश्वर-पोलादपूर या महामार्गासह पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यांच्या कामांना गती द्या- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले – महासंवाद
    नागपूर नवीन विधानभवनचे काम विहित कालावधीत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    येवला औद्योगिक वसाहतीमध्ये मूलभूत सोयीसुविधांची तत्परतेने  उपलब्धता करावी – अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed