• Sat. Sep 21st, 2024

अवकाळी पावसाचा फटका, कापूस पिवळा पडत असल्याने चिंतेत वाढ, शेतकरी दुहेरी संकटात

अवकाळी पावसाचा फटका, कापूस पिवळा पडत असल्याने चिंतेत वाढ, शेतकरी दुहेरी संकटात

परभणी:मागील आठ दिवसापासून परभणीमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याने त्याचा फटका आता कापूस उत्पादक शेतकऱ्याला बसत आहे. वेचणी अभावी शेतामध्ये राहिलेला कापूस या अवकाळी पावसाच्या पाण्यामध्ये पिवळा पडण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्याच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. पिवळ्या पडलेल्या कापसाला बाजारामध्ये कमी भाव येणार असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचण निर्माण होणार आहे.खरीप हंगामामध्ये परभणी जिल्ह्यातील एक लाख हेक्टरच्या वर जमिनीवर शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. मागील वर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्यामुळे यावर्षी देखील चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे कापसाला भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली होती. अशातच परभणी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मागील आठ दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे.

बाजारपेठेत भाव नाही, पांढरं सोनं घरातचं पडून; कापसामध्ये पिसवांची पैदास, शेतकऱ्यांनी घेतला कटू निर्णय

त्यामुळे वेचणी अभावी शेतामध्ये झाडाला शिल्लक असलेला कापूस आता पिवळा पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. कापूस पिवळा पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. परभणी जिल्ह्यामध्ये परत अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. तर दुसरीकडे शेतात असलेला कापूस वेचणीसाठी मजूर सापडत नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ होत असल्याचे चित्र परभणी जिल्ह्यामध्ये पहावयास मिळत आहे.

बळीराजाचं पिवळं सोनं डोळ्यांदेखत वाहून गेलं, अवकाळी पावसाचं भीषण रूप दाखवणारा हा VIDEO पाहाच…
दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी कापूस ठेवला घरात

यावर्षी कापसाला अपेक्षित असा बाजारपेठेमध्ये भाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परभणीमध्ये सध्या आठ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाचे खरेदी केली जात आहे. कापसाचे भाव काही दिवसांनी वाढतील या प्रतीक्षेमध्ये जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी आपल्या घरामध्ये कापसाची साठवणूक करून ठेवली आहे. मात्र भाव वाढत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापसाचे भाव वाढतील का अशी चर्चा आता शेतकरी करताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed