• Sat. Sep 21st, 2024
तू मला खूप आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करेन; प्रपोजल नाकारताच तरुणीच्या गळ्यावर चाकूने वार

डोंबिवली:एकतर्फी प्रेमातून १४ एप्रिलच्या मध्यरात्री आरोपी जिग्नेश जाधव याने एका २५ वर्षीय तरुणीवर गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. यात तरुणी गंभीर जखमी होती. तर आरोपीने तेथून पळ काढून फरार झाला.दरम्यान आरोपी हा नाशिक येथे असल्याचे गुप्त माहिती टिळकनगर पोलिसांना मिळाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदशनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक अजिंक्य धोंडे,पोलीस श्याम सोनवणे,अजित राजपूत संदीप सकपाळ,उमेश राठोड,रवींद्र बागल यांच्या पथकाने आरोपीला नाशिक येथून अटक केली आरोपी जिग्नेश यांने गुन्हा केला असल्याची कबुली दिली.तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रविण बाकले करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

एकतर्फी प्रेम करणाऱ्या मित्राला २५ वर्षीय मैत्रिणीने लग्नास नकार दिल्याच्या वादातून भर रस्त्यात आरोपी मित्राने धारदार चाकूने गळ्यावर वार करून मैत्रिणीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील एका सोसायटी समोरील रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात आरोपी मित्रावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला.

जखमी २५ वर्षीय तरुणी ही डोंबिवली पूर्व भागात राहते. तर आरोपी मित्र जिग्नेश हा डोंबिवली पूर्वेकडील देसलेपाडा भागात राहतो. दोघेही एकाच भागात राहत असल्याने दोघांमध्ये मैत्री होती. मात्र मैत्रीच्या आडून आरोपी जिग्नेश हा जखमी काजलवर एकतर्फी प्रेम करीत होता. त्यातच १४ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास काजल ही एकटीच घरच्या दिशेनं पायी जात होती. त्याच सुमाराला ती डोंबिवली पूर्वेकडील शांतीनगर भागातील वेद ओमशांती सोसायटी समोरील रस्त्यावर येताच, आरोपी जिग्नेशने तिला रस्त्यात थांबवून ‘तू मला खूप आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करेन, तू माझ्या बरोबर ये’, असे बोलत असतानाच तिने त्याला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या आरोपी जिग्नेश याने त्याच्याकडे असलेल्या धारदार चाकूने काजलच्या गळयावर वार करून घटनास्थळावरून पळून गेला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत गंभीर जखमी अवस्थेत तरुणीला डोंबिवलीतील रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी ठाण्यातील कळवा तेथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते.

राहत्या घरात आढळला पत्नीचा मृतदेह, पती सापडेना, बदलापूरमधील महिलेच्या मृत्यूचे गूढ संपेना

तर आरोपीने तेथून पळ काढला. दरम्यान आरोपी हा नाशिक येथे असल्याचे गुप्त माहिती टिळकनगर पोलिसांना मिळाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांच्यामार्गदशनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक अजिंक्य धोंडे,पोलीस श्याम सोनवणे,अजित राजपूत संदीप सकपाळ,उमेश राठोड,रवींद्र बागल यांच्या पथकाने आरोपीला नाशिक येथून अटक केली आरोपी जिग्नेश यांने गुन्ह्या केला असल्याची कबुली दिली.तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता २४ एप्रिल पर्यन्त पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रविण बाकले करत आहेत.

सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed