• Sat. Sep 21st, 2024
तीन महिन्यांपासून घरी परतला नाही, कर्मभूमीतच आयुष्याची दोर कापली; चिठ्ठीत लिहून गेला…

ठाणे: शहाड नजीक असलेल्या बंदरपाडा येथील लाकडाच्या कारखान्यात काम करणाऱ्या एका कामगाराने कारखान्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या कामगाराचे नाव कैलास अहिरे असं आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्याच्या डोक्यावर कर्ज होते. वखारीचा मालकाने त्याचा १६ महिन्यांपासून पगार दिला नव्हता. एकीकडे कर्ज आणि मालकाकडून मिळत नसलेला पगार या विवंचनेतून कामगार कैलासने आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली. या घनटेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

कैलास हा डोंबिवली अहिरे गावात वास्तव्यास होते. तो बंदरपाडा येथील लाकडाच्या कारखान्यात कामाला होते. तो कारखान्यातच राहत होता. मात्र, तो त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात होते. कैलास याला त्यांचा मालक पगार देत नसल्याने घर खर्च भागविण्यासाठी कैलास याने काही लोकांकडून उसने पैसे घेतले होते. त्याच्या डोक्यावर कर्ज होते. पगार होत नसल्याने कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत कैलास होता.

मैदानाबाहेरून आशिष नेहराचा मेसेज आणि मोहित शर्माची घातक ओव्हर; पाहा काय घडलं शेवटच्या षटकात
पगार होत नसल्याने घरच्यांना काय सांगायचं? असा प्रश्न त्याच्या पुढे होता. तो तीन महिन्यांपासून घरी जात नव्हता. तीन महिन्यांपासून त्याच्या कारखान्याचा मालक कैलासला पगार देण्याचे आश्वासन देत होता. मात्र, कैलास याला पगार दिला गेला नाही. कैलास याचा मुलगा यशवंत याने सांगितले की, “वडील घरी येत नव्हते. कारखान्याचा मालक त्याच्या वडिलांकडून काम करुन घेत होता. मात्र, घरी सोडत नव्हता”. या घटनेची नोंद खडकपाडा पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरु आहे.

सहा महिन्यांचा संसार, गरोदर पत्नीला माहेरी धाडलं, सांगलीतील तरुणाने बिहारला आयुष्य संपवलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed