• Mon. Nov 25th, 2024

    धर्माधिकारी यांच्या नावाचे समाजमाध्यमांवरील व्हायरल पत्र खोटे, प्रतिष्ठानचे स्पष्टीकरण

    धर्माधिकारी यांच्या नावाचे समाजमाध्यमांवरील व्हायरल पत्र खोटे, प्रतिष्ठानचे स्पष्टीकरण

    अलिबाग :महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक चुकीचा मजकूर असलेले पत्र शनिवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. पण हे पत्र तद्दन बनावट असल्याचे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. विद्यमान सरकारवर आरोप करणारे असे कोणतेही पत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वतीने जारी करण्यात आले नसल्याचेही रेवदंडा येथील धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहेमहाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणादरम्यान श्री सदस्यांच्या उष्माघाताने झालेल्या मृत्यूमुळे राजकारण तापले असतानाच, शनिवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले. ज्यात राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले गेले होते. शासनाने दिलेला पुरस्कार परत करणार असल्याचेही नमूद करण्यात आले होते.

    दुर्दैवी! सुट्टी जीवावर बेतली, मेडिकल कॉलेजचे १० विद्यार्थी धरणात पोहायला गेले, एकाचा बुडून मृत्यू
    खोट्या पत्रात बनावट मजकूर- नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान

    माझ्या अनुयायांचा मतांसाठी वापर केला. माझ्या साधकांसाठी मंडप टाकला नाही. झालेल्या घटनेची पूर्ण जबाबदारी घेऊन मी श्री सेवकांची माफी मागतो. माझ्या सर्व श्री सेवकांना मी आवाहन करतो की यापुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका, असा बनावट मजकूर या खोट्या पत्रात नमूद करण्यात आले होते.

    धक्कादायक! महिलेला तिचा जिम वर्कआउटचा फोटो व्हॉट्सअप केला, खाली लिहिला अश्लील मेसेज, विनयभंगाचा गुन्हा दाखल
    समाजमाध्यमांवर हे पत्र वेगाने व्हायरल होण्यास सुरुवात झाल्यामुळे खळबळ उडाली होती. याबाबत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रवक्ते तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप पाटील यांच्याकडे विचारणा केली असता हे पत्र बनावट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोणीतरी खोडसाळपणा करून जाणीवूर्वक यापूर्वी आप्पासाहेबांनी काढलेल्या पत्राचा वापर करून त्यातील मूळ मजकूर काढून त्यात, फेरफार करून हे पत्र तयार केले असल्याचे नमूद केले आहे.

    RCB vs RR Pitch Report: आरसीबीच्या घरात होणार राजस्थानचा हल्लाबोल, जाणून घ्या कशी आहे खेळपट्टी आणि हवामान
    पोलिसांनी पत्राची घेतली गंभीर दखल

    दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल रायगड पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed