• Mon. Nov 25th, 2024

    गोदावरी नदीपात्रात लाखो मासे मृतावस्थेत, घाटात दुर्गंधी, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

    गोदावरी नदीपात्रात लाखो मासे मृतावस्थेत, घाटात दुर्गंधी, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

    अर्जुन राठोड, नांदेड :नांदेडमध्ये गोदावरी नदीच्या पात्रात लाखोच्या संख्येने मासे मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आली आहे. गोवर्धन घाट, नगीना घाट, बंदा घाट या नदी घाटांवर मृत माशांचा खच आढळून आला आहे. या मृत माशांमुळे नदी घाट परिसरात मोठी दुर्गंधी देखील पसरली आहे.हे मृत मासे आले कुठून आणि त्यांचा मृत्यू नेमका कुठल्या कारणामुळे झाला, हे मात्र अद्यापही अस्पष्टच आहे. दरम्यान हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शनिवारी महापालिका प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी तात्काळ गोदावरी नदीतील मृत मासे काढण्याचे काम सुरु केले. पण अद्यापही प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची कुठलीच दखल घेतली नसल्याची माहिती आहे.

    मृत माशांचा खच आढळल्याचा प्रकार उघडकीस येऊन अनेक तास उलटले असले तरी प्रदूषण विभागाचा एकही अधिकारी घटनास्थळी पोहचला नाही. दरम्यान यापूर्वी देखील अशाच प्रकारे मृत माशांचा खच आढळला होता. अशाप्रकारे घटना घडत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    खारघरहून येताना मीनाक्षीताईंचा हात सुटला, अन् डोळ्यादेखत…मैत्रिणीने सांगितला भयावह अनुभव
    शहरातील १८ नाल्यांचे घाण पाणी गोदावरी नदीत मिसळत आहे. गोदावरी नदी दूषित झाली आहे. या घाण पाण्यामुळेच लाखो माशांचा मृत्यू झाला आहे, असा अंदाज जल अभ्यासक तथा सायन्स महाविद्यालयाचे मत्स्यशास्त्र व प्राणी शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. किरण शिल्लेवार यांनी व्यक्त केला आहे.

    एक चूक आणि स्कॉर्पिओ गाडी थेट गोदापात्रात, पाहा नेमकं काय घडलं…

    या घटनेला महापालिका जबाबदार असून आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिलेवार यांनी केली आहे. दरम्यान या प्रकारानंतर शिलेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार देखील केली आहे.

    लग्नानंतर तीन महिन्यात साथ सुटली, मशिन सुरु करताच विजेचा धक्का, नवविवाहित तरुणाचा करुण अंत

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed