• Sat. Sep 21st, 2024
रात्रीची ड्युटी ठरली जीवघेणी, वाहनासमोर हरीण आल्यानं भीषण अपघात; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर: पोलीस वाहन घेऊन रात्रपाळीची ड्युटी करत असताना वाहनासमोर हरीण आल्याने वाहन थेट झाडावर जाऊन धडकलं. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज शनिवार पहाटे तीन वाजेच्या सुमारास लोणी ते शिऊर बंगला रोडवर लोणीकडून शिऊर बंवल्याकडे येत असताना राधाकृष्ण मंगल कार्यालयासमोर घडली. या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पोलीस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल एकनाथ भदाणे (वय ४८ रा. हडको कॉर्नर, ३ वानखेडे नगर) आणि पोलीस कॉन्स्टेबल सिध्देश्वर इधाटे (वय २२, रा. छत्रपती संभाजीनगर) हे दोघे शिऊर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. शुक्रवारी दोघांची रात्रपाळीची ड्युटी सुरू होती. यामुळे दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करण्यासाठी रात्री ११ वाजता दोघे पोलिसांचे वाहन असलेली चारचाकी घेऊन गस्तीवर होते.

विधानसभेला चंद्रकांतदादांसाठी सीट सोडली, मेधा कुलकर्णी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीस उत्सुक
दरम्यान, पहाटे तीन वाजेच्या सुमारास लोणी ते शिऊर बंगला रोडवर लोणीकडून शिऊर बंवल्याकडे येत असताना राधाकृष्ण मंगल कार्यालयासमोर त्यांच्या वाहनासमोर हरीण आल्याने चारचाकी झाडाला धडकली. या अपघातात चालक सिध्देश्वर इधाटे यांच्या हाताला लागल्यामुळे त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तर विठ्ठल भदाणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना बेशुद्ध अवस्थेत तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल हे मनमिळावू स्वभावाचे होते. यामुळे त्यांच्या जाण्याने पोलीस खात्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक वर्षापूर्वी विठ्ठल यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. या संकटातून कुटुंब सावरत नाही तोच विठ्ठल यांचा मृत्यू झाला. विठ्ठल भदाणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, पुण्यात लागले अजित पवारांचे बॅनर, राष्ट्रवादी आणि घड्याळ गायब!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed