• Mon. Nov 25th, 2024

    मुंबईकरांनो, उद्या बाहेर फिरण्याचा प्लॅन करताय? जाणून घ्या मेगाब्लॉक कुठे अन् कधी असेल…

    मुंबईकरांनो, उद्या बाहेर फिरण्याचा प्लॅन करताय? जाणून घ्या मेगाब्लॉक कुठे अन् कधी असेल…

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई :माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे/चुनाभट्टीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर माहीम ते मुंबई सेंट्रलदरम्यान शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असल्याने रविवारी दिवसा ब्लॉक असणार नाही. ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार असून काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.मध्य रेल्वे

    स्थानक – माटुंगा ते मुलुंड
    मार्ग – अप आणि डाउन धीमा
    वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५पर्यंत

    परिणाम – ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

    हार्बर रेल्वे

    स्थानक – सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे
    मार्ग – अप आणि डाउन
    वेळ – सकाळी ११.४० ते दुपारी ४.४०पर्यंत

    परिणाम – सीएसएमटी वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेलकरिता धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव लोकल फेऱ्यादेखील रद्द राहणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ल्यादरम्यान फलाट क्रमांक ८वरून विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

    पश्चिम रेल्वे

    स्थानक – माहीम ते मुंबई सेंट्रल
    मार्ग – अप जलद आणि पाचवी मार्गिका
    वेळ – शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवारी पहाटे ४

    परिणाम – जलद मार्गिकांवरील लोकल फेऱ्या सांताक्रूझ ते चर्चगेटदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक असणार नाही.
    रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! उद्यापासून गोरखपूरसाठी धावणार समर स्पेशल ट्रेन; जाणून घ्या वेळापत्रक…
    रेल्वे पुलाची गर्डर उभारणी

    पश्चिम रेल्वेकडून वैतरणा आणि सफाळे दरम्यान रेल्वे उड्डाणपुलाकरिता पाच गर्डरची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी उद्या, रविवारी सकाळी ८.५५ ते सकाळी १०.५५पर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक पश्चिम रेल्वेने घोषित केला आहे. ब्लॉक वेळेत बोईसर-वसई रोड मेमू (०१३३७) आणि दुपारी १२ वाजताची विरार-चर्चगेट लोकल रद्द राहणार आहे.
    चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जत-खोपोली लोकल तीन दिवस रद्द, जाणून घ्या वेळापत्रक…
    ब्लॉक वेळेत भिवंडी रोड ते बोईसर मेमू (०१३३८) वसई रोडपर्यंतच चालविण्यात येणार आहे. डहाणू रोड ते बोरिवली, चर्चगेट ते डहाणू रोड, डहाणू रोड ते विरार, चर्चगेट ते डहाणू रोड या लोकल केळवे रोडपर्यंतच धावणार आहेत. याच स्थानकातून गाड्या परतीच्या प्रवासासाठी रवाना होतील. दादर, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसमध्ये येणाऱ्या सहा मेल-एक्स्प्रेस २५ मिनिटे ते सव्वा तास विलंबाने धावणार आहेत, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *