• Sat. Sep 21st, 2024

आर्सेलर मित्तलची राज्यात ८० हजार कोटींची गुंतवणूक? कंपनीच्या शिष्टमंडळाची प्राथमिक चर्चा

आर्सेलर मित्तलची राज्यात ८० हजार कोटींची गुंतवणूक? कंपनीच्या शिष्टमंडळाची प्राथमिक चर्चा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :पोलादनिर्मिती आणि प्रक्रिया, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल इंडिया लि. ही पोलाद निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी महाराष्ट्रात आणखी ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. याबाबत कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शुक्रवारी प्राथमिक चर्चा केली.सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या चर्चेच्यावेळी महाराष्ट्रातील पोलाद उद्योगात आणखी गुंतवणूक करण्याची कंपनीने इच्छा व्यक्त केली. यासाठी बंदराजवळ पाच हजार एकर जमीन बंदराजवळ व रस्ते, रेल्वेचे जाळे तयार असलेल्या ठिकाणी हवी असल्याची मागणी कंपनीने राज्य सरकारकडे केली. शिवाय वांद्रे-कुर्ला संकुलात कंपनीच्या कॉर्पोरेट मुख्यालयासाठी जागा देण्याची विनंती केली. यावर फडणवीस यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सीमा परिसरात सुमारे एक हजार एकर जमीन प्राथमिक टप्प्यात देण्यास तत्त्वत: मान्यता दिली. याबाबत जागा निश्चिती, उर्वरीत जमीन आणि भूसंपादन प्रक्रियेसाठी मेरिटाइम बोर्ड, एमआयडीसी आणि कंपनी प्रतिनिधींनी स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घ्यावा. कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यातील हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, असे यावेळी सांगितले.

या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्र सिंह कुशवाह, आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल इंडिया लि.चे विक्री संचालक आलेन लेगरीस, ऋषिकेश कामत, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे आदी उपस्थित होते.

देशभरात आता घर खरेदीसाठी समान करार, कराराचा मूळ मसुदा, अटी व शर्ती सारख्याच असणार
हजारो तरुणांना रोजगार मिळेल…

या बैठकीत उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी प्रास्ताविक केले. रंजन धर यांनी कंपनीची गुंतवणुकीविषयीची माहिती दिली. ही कंपनी आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देणारी असून कंपनीने करोनाकाळात वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा केला होता. भारतात पोलाद उत्पादनवाढीसाठी कंपनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. खोपोली, तळेगाव, सातार्डे (सिंधुदुर्ग) येथे कंपनीमध्ये हजारो तरुणांना रोजगार मिळाला आहे. आणखी हजारो तरुणांना रोजगार मिळणार असून कंपनी शिक्षण, आरोग्य, विमानतळाच्या पायाभूत सुविधामध्येही काम करणार असल्याचे धर यांनी सांगितले.
भर उन्हाळ्यात मुंबईकरांचा सुखद प्रवास होणार, मेट्रोने घेतला मोठा निर्णय, ७, २A मार्गावर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed