• Sat. Sep 21st, 2024

Mumbai : ऐन उकाड्यात AC लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, ११ फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचा मनस्ताप

Mumbai : ऐन उकाड्यात AC लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, ११ फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचा मनस्ताप

AC Local Train Mumbai : मुंबईसह महाराष्ट्रात तापमान वाढलं आहे. मुंबईतील उकाडा वाढल्याने विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. अशा उकाड्यात एसी लोकलचा मुंबईकरांना आधार असतो. पण ऐन उकाड्यात एसी लोकलच्या ११ फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचा मनस्ताप झाला.

 

ac local train on western railway
पश्चिम रेल्वेवरील दोन AC लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, ११ फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचा मनस्ताप
म. टा. प्रतिनिधी, मुंबई :पश्चिम रेल्वेवरील दोन एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवारी एसी लोकलच्या पास आणि तिकीटधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दिवसभरात धीम्या-जलद मार्गावरील ११ एसी लोकल फेऱ्या रद्द झाल्याने तिकीटधारकांच्या त्रासात आणखी भर पडली.वाढत्या उकाड्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलला प्रचंड मागणी आहे. कामावर वेळेवर पोहोचण्याची लगबग असतानाच विरार-चर्चगेट लोकलमध्ये एसीचा थंडावा कमी झाला. दरवाजे, खिडक्या बंद असल्याने प्रवासी घामाघूम झाले. मिरारोड ते महालक्ष्मी हे अंतर दरवाजे खुले ठेवून एसी लोकल धावली. लोकल फेऱ्या रद्द झाल्याने रेल्वे प्रशासनाने तिकीट व पासच्या पैशांचा परतावा द्यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली.

भर उन्हाळ्यात मुंबईकरांचा सुखद प्रवास होणार, मेट्रोने घेतला मोठा निर्णय, ७, २A मार्गावर…
विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या धीम्या एसी लोकलमध्ये वातानुकूलित यंत्रणांमधून कमी थंडावा येत असल्याच्या तक्रारींमुळे प्रवाशांनी सकाळी ९.०२ वाजता मिरारोड स्थानकात आपत्कालीन साखळी ओढून गाडी थांबवली. तांत्रिक अडचणींमुळे एका डब्यातील दोन दरवाजे बंद आणि दोन खुले ठेवून गाडी महालक्ष्मी स्थानकात आणून दुरुस्ती करण्यात आली. दुरुस्तीनंतर एसी यंत्रणा सुरू झाली आणि दरवाजे बंद करून गाडी चर्चगेटकडे रवाना करण्यात आली, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जत-खोपोली लोकल तीन दिवस रद्द, जाणून घ्या वेळापत्रक…
कारशेडमध्ये तपासणी करताना अन्य लोकलमध्येही तांत्रिक बिघाड असल्याची बाब रेल्वे अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. ही गाडी जलद मार्गावर धावणार होती. बिघाड वेळेत दुरुस्त न झाल्याने ही गाडी प्रवासी सेवेत न चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सात एसी जलद लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या दोन्ही लोकलमधील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू होते, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed