समलिंगी संबंध प्रस्थापित करण्यासाठी फेमस असलेल्या “बोल्ड गे” या ॲपच्या माध्यमातून मंठा येथील एका ग्रुपच्या प्रदीप कायंदे हा दोन वर्षापासून संपर्कात आला होता. प्रदीपच्या नोकरीचे ठिकाण जालना हेच होते. त्यामुळे तो त्याचे गाव उंबरखेड येथून नेहमी जालना येथे दुचाकी वरून ये-जा करायचा. पण जेव्हा केव्हा त्याला लहर आली की घरी पत्नी-मुलं असताना घरी न जाता तो थेट मंठा येथील त्याच्या समलिंगी मित्राकडे जायचा.
७ एप्रिल रोजी सर्व काम आटोपल्यावर प्रदीप हा गावी न जाता रात्री जालना येथून थेट मंठा येथील त्याचा मित्र सोपान सदाशिव बोराडे याच्या शांतीनगर घरी मुक्कामाला गेला. त्याने आधी ठरल्याप्रमाणे आपल्या समलिंगी मित्रासोबत लैंगिक संबंध ठेवले. नंतर त्याच्या पत्नीसोबतही लैंगिक संबंध ठेवले. त्या रात्री प्रदीप हा सोपान बोराडे याच्या घरी थांबलेला होता. पण अनैतिक संबंधावरून काही तरी खटकले आणि प्रदीप आणि सोपानमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला आणि तो वाद वाढतच गेला.
रागाने बेफाम झालेल्या सोपान बोराडे याने त्याच्या काही मित्रांना बोलावून प्रदीपला बेदम मारहाण केली. त्यात डोक्यावर घाव बसल्याने प्रदीप कायंदे जागेवरच ठार झाला. घटनेनंतर सोपान बोराडे याने त्याचा होमगार्ड भाऊ प्रकाश बोराडे याच्या मदतीने प्रकाशचे मृतदेह उचलला आणि मंठा बाजार समितीच्या आवारात असलेल्या जगदंबा जिनिंगमध्ये नेऊन टाकल्याचे पोलिस तपासात समोर आलं आहे.
हत्या झालेला प्रकाश हा २ वर्षांपासून सोपान सोबत समलिंगी संबंध प्रस्थापित झाल्यानंतर त्याच्या पत्नीसोबतही अनैतिक संबंध ठेवत असल्याची धक्कादायक बाबही तपासात पुढे समोर आली आहे. या धक्कादायक प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती काही व्हिडिओ, फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग सुध्दा लागल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधार सोपान बोराडे आणि त्याचा भाऊ प्रकाश बोराडे यांना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली आहे.
या प्रकरणात आणखी आरोपी असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे, परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक आसमान शिंदे, पोलीस कर्मचारी संतोष बनकर, मांगीलाल राठोड, दीपक आडे, श्याम गायके, प्रशांत काळे, सुनील इलग, आकाश राऊत, ब्रह्मानंद जायभाये, आनंद ढवळे, महिला पोलीस कर्मचारी सविता फुलमाळी, मार्कंडे आदींनी ही कामगिरी केली आहे.