• Sat. Sep 21st, 2024
भरधाव वेग ठरला जीवघेणा, अल्टो कार आणि दुचाकीची जोरदार धडक, एकाने जागीच जीव गमावला

बुलडाणा:गेल्या‌ आठवड्याभरापासून जिल्ह्यात‌ अपघाताचे सत्र सुरुच आहे. बुलडाणा तालुक्यातील धाड येथे आल्टो कार आणि दुचाकीमध्ये‌ भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना २१ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास धाड छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेली सहकार विद्या मंदिर जवळ घडली आहे. संतोष विश्वनाथ शेवाळे (वय २३ रा.ढासाळवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या‌ दुचाकीस्वाराचे नाव आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, संतोष शेवाळे हे त्याच्या एच. एफ. डिलक्स मोटरसायकल क्रमांक एम. एच. २८ बी. टी‌ ९५३० ने आव्हाना येथून ढासाळवाडी कडे येत असताना सहकार विद्या मंदिर जवळ धाडकडून संभाजीनगरकडे जाणारी अल्टो कार क्रमांक एम. एच. ०३ बी. एच. १९६९ चालक दिलीप कुमार हेम प्रकाश बघेल (रा. नुरपूर जि. उत्तर प्रदेश) यांच्या‌ कार आणि दुचाकीचा समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यामध्ये‌ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

२४ डोळे, हार्ट अटॅक आणणारं विष… एका इंचाच्या या प्राण्याने शास्त्रज्ञांची झोप उडवली…
मृताच्या भावाचा कारचालकावर निष्काळजीपणाचा आरोप

घटनेची माहिती मिळताच धाड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा आणि कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. मृतकाचा भाऊ दिपक शेवाळे यांना दिलेल्या‌ तक्रारीनुसार कार चालक यांनी भरधाव वेगाने निष्काळजीपणाने कार चालवून दुचाकीस्वार यांना धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. यावरुन पोलिसांनी कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा पुढील तपास बीट अंमलदार सुरेश मोरे करत आहेत.

नवनिर्वाचित सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; भर चौकात आधी रेकी, काहीच मिनिटांत हल्ला

ट्रॅक्टर पलटी होऊन दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

दुसरीकडे, पुण्यातील आंबेगाव येथेही एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. हे मुलं पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील रांजणी येथील रहिवासी होते. आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात हद्दीवर असणाऱ्या शिरोली सुलतानपूर गावच्या हद्दीत अंगावर शहारे आणणारी ही घटना घडली आहे. गुरुवारी रात्री उशिरा हा अपघात झाल्याची माहिती आहे.

शाळकरी मुलांच्या हाती वाहन देणं जीवावर, ट्रॅक्टर पलटून चिरडल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed