अवजड वाहने आणि मालवाहतूक शहराबाहेरून करण्याच्या दृष्टीने मुंब्रा बायपास सोयीचा रस्ता असला तरी हा रस्ता सातत्याने नादुरुस्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक कल्याण-भिवंडीमार्गे वळवण्यात आली आहे. तर अनेक वाहने नवी मुंबईतून पूर्व द्रुतगती महामार्गावरून नाशिक आणि गुजरात दिशेकडे जात आहेत. शिवाय नाशिकडून नवी मुंबईच्या दिशने येणारी वाहनेही मुंब्रा बायपास बंद असल्यामुळे ठाणे शहरातून नवी मुंबईकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. याबरोबरच मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत आणि खारेगांव पुलाच्याही दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्यामुळे ही वाहतूकही अरुंद पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर गुरुवारी वाहतूककोंडी झाली. उन्हाचा त्रास आणि कोंडीचा मनस्ताप यामुळे वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात होता. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कोंडी कायम असल्यामुळे कामावर जाण्यासाठी आणि घरी परतण्यासाठीही त्रास सहन करावा लागत होता.