• Sat. Sep 21st, 2024
कबड्डी स्पर्धेत क्षुल्लक वाद, गैरसमजुतीतून दुसऱ्याच तरुणावर तलवारीने वार; रत्नागिरीत खळबळ

रत्नागिरी: संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे कबड्डी स्पर्धेतून झालेल्या वादाच्या रागातून साखरपा गावातील सागर वैद्य या २२ वर्षीय तरुणावर सुमारे १० जणांनी तलवारीने सपासप वार केल्याने परिसर हादरला आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सागर वैद्य याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या हल्ल्यानंतर साखरपा येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सद्यस्थितीत साखरपा येथे तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

दरम्यान, साखरपा बाजारपेठ आज बंद ठेवण्यात आली आहे. साखरपा येथे आज नागरिकांनी मोर्चा काढून या सगळ्या घटनेचा निषेध केला आहे. साखरपा येथील घटनेची जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी गंभीर दाखल घेतली असून “आरोपींना लवकर अटक करण्यात येईल. कायदा कोणी हातात घेऊ नये”, असं आवाहन त्यांनी केलं आहे. या सगळ्या प्रकरणी संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहून जाणाऱ्या जवानांना वाचवताना वाशिमचे सुपुत्र अमोल गोरे शहीद, ४ वर्षांच्या लेकाकडून मुखाग्नी
नागरिकांनी साखरपा दुरुक्षेत्राला घेराव घालत “जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत येथून हलणार नाहीत”, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. या घटनेमुळे साखरपा गावात तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरा पोलिसांची अतिरिक्त कुमक रत्नागिरीतून साखरपा गावाकडे रवाना झाली होती. तर उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे हे रात्री घटनास्थळी दाखल झाले होते.

नेमकं काय आहे प्रकरण?

गेले तीन दिवस साखरपा येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डीचा सामना सुरू होता. त्या ठिकाणी एक तरुण उभा होता. त्याच्या पाठीमागे प्रेक्षक असल्याने त्याला बाजूला होण्याचं काहींनी त्याला सांगितलं आणि यातच वादाला सुरुवात झाली. परंतु त्यानंतर हा वाद चर्चेद्वारे मिटवण्यात आला होता. परंतु संबंधित व्यक्तींच्या डोक्यात राग खदखदत होता.

कबड्डी स्पर्धेत वाद झालेल्या ज्या तरुणाबद्दल राग होता. ज्याच्यावर हल्ला करायचा होता. तो तरुण जी गाडी चालवत होता, त्या गाडीसारखीच गाडी सागर वैद्य घेऊन गेला होता. त्यामुळे कबड्डी स्पर्धेत वाद झाला होता तो हाच तरुण असल्याचा समज करून घेत तब्बल १० जणांनी तलवारीने सागर वैद्य याच्यावर सपासप वार केले. यामध्ये सागर जखमी अवस्थेत जागीच कोसळला. त्याला तात्काळ साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर साखरपा गावात तणाव निर्माण झाला असून मोठा जमाव साखरपा दुरक्षेत्रवर धडकला होता. तर रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार तेथील एका हॉटेलवर हल्ला झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले, परंतु याला पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिला नव्हता. रात्री उशिरा पोलिसांची अतिरिक्त कुमक रत्नागिरीतून साखर त्याच्या दिशेने रवाना झाली होती. दरम्यान, आता साखरपा येथे परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. या सगळ्या घटनाक्रमावर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे लक्ष ठेवून आहेत.

राहुलला अश्विनने बोल्ड केलं पण नोबॉल नसतानाही पंचांनी नॉट आऊट ठरवले, पाहा असं काय घडलं…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed